khandoba pali information marathi
संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत ( खंडोबा ) पाली हे ठिकाण महाराष्ट्र्रातील सातारा या जिल्यात आहे . शंकराचे अवतार असणारा पाली खंडोबा(khandoba pali) हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे .पुणे- कराड मार्गावर उंब्रजवरून काशीळकडे साधारणपणे ५ कि.मी. अंतरावर पाली हे गाव आहे. या गावावरूनच त्याला पालीचा खंडोबा या नावाने ओळखतात. हजारो लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात .जानेवारी महिन्यात या ठिकाणी मोठी यात्रा भरते खंडोबा देवाचे मंदिर हे तारळी नदीच्या तीरावर आहे .पुण्यापासून १३५ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण असून तेथे जाण्यासाठी २ तासाचा वेळ लागतो .
सदरच्या देवस्थानात दररोज ४ वेळा पूजा अर्चा केली जाते. देवस्थान हेमाडपंथी असून ते सुमारे १ हजार वर्षांपूर्वीचे आहे. मंदिरात नारळ वाढवीत नाहीत. बकरीचा पशुबळी दिला जातो. येथे पौष महिन्यात मृग नक्षत्रावर खंडोबाचे व म्हाळसाचे लग्न लागते, त्याची पौराणिक कथा खालीलप्रमाणे –
ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्यावेळी श्री भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण करून देवांना व दैत्यांना अमृत व सुरापान यांचे वाटप केले त्यावेळेस मोहिनीचे रूपावर शंकर भाळले, त्यावेळी श्री विष्णूने शंकरास सांगितले की तू ज्यावेळी मार्तंड भैरवाचा अवतार धारण करशील त्यावेळी मी तुझी इच्छा पूर्ण करीन. त्याप्रमाणे श्री भगवान शंकराने पार्वतीच्या शरीरात प्रवेश करून मोहिनीचे रूप धारण केले व ती अतिसुंदर दिसू लागली म्हणून तिचे नाव महालयाशक्ती असे ठेवले, तीच म्हाळसा.
तिने तिम्माशेठ वाण्याच्या घरी बालकन्येचे रूप धारण केले व तिचा विवाह सदर वाण्याने मार्तंड भैरवाशी पौष शु. पौर्णिमा या दिवशी करून दिला. म्हाळसा व महाळसाकांत येथूण गुप्त झाले आणि ते शिवलिंगरूपाने प्रकट झाले. त्यावेळी पाली येथील खंडोबास मल्हारी म्हाळसाकांत हे नाव पडले. पालाई गवळण यांच्या भक्तीप्रीत्यर्थ येह्ते देव निर्माण झाला म्हणून पालाई या नावावरून सदर गावास पाल हे नाव पडले.
सदर देवाचा पुजारी दरवर्षी बदलतो. त्याचप्रमाणे वारकरी मात्र प्रतिदिनी बदलतो. गावाची वस्ती २,५०० असून तेथील महादेवांस उमा-महेश्वर या नावाने संबोधले जाते. देवास फुलाचा कौल लावला जातो. कौल उजवा दिल्यास देवाचे करणे काही राहिले नाही व कौल डावा दिल्यास आपले काही राहिले आहे असे तेथील भाविक लोक मानतात. सदरच्या मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरू असून त्यास अंदाजे रु १२ लक्ष खर्च अपेक्षित आहे. सदरचा खर्च हा भाक्तांच्या देणगीतूनच करण्यात येतो. सदरच्या जीर्णोद्धाराचे काम श्री. चंद्रशेखर स्वामीनाथन शेखाई (तामिळनाडू) हे करीत आहे. सदा देवस्थानचे व्यवस्थापक म्हणून श्री. लक्ष्मण दिगंबर वेदपाठक हे आहेत.
एक वाघ्या – खंडोबाला वाहिलेल्या पुरुषास वाघ्या तर स्त्रीस मुरळी असे म्हणतात. खंडोबा हे दैवत बहुपत्नीक आहे. खंडोबाच्या स्त्रिया वेगवेगळ्या जातीतील आहेत. अशा बहुपत्नीकत्वामुळे त्या जातींमध्ये एक प्रकारचा सांस्कृतिक धागा तयार झाला आहे. खंडोबाची पहिली पत्नी म्हाळसा लिंगायत असून दुसरी पत्नी बाणाई (वा पालाई) धनगर आहे. मोहिनी व पार्वती यांचा संयुक्त अवतार मानण्यात येतो. म्हाळसा नेवाश्याच्यातिमशेट नावाच्या। व्यापार्याच्या घरात जन्मली. स्वप्नात मिळालेल्या खंडोबाच्या दृष्टांतानुसार तिमशेटने पाली (जि. सातारा) येथे पौष पौर्णिमेस दोघांचे लग्न लावले असे सांगितले जाते. दुसरी पत्नी बाणाई (बनाई ?) इंद्राची मुलगी असल्याचे मानले जाते. ही एका धनगरास सापडली. बाणाईला जेजुरी येथे पती मिळेल असे वर्तविण्यात आले. जेजुरीस बाणाईने खंडोबास पाहिले तिथे दोघे प्रेमात पडले. बाणाईच्या सहवास मिळण्यासाठी खंडोबाने आपली पत्नी म्हाळसा हिच्या सोबत सारीपाटाचा डाव मांडला. डाव हरणार्यास बारा वर्षे वनवास ही अट होती. खंडोबा हा डाव हरला व धनगराचे रूप घेऊन बाणाईच्या पित्याकडे नोकर म्हणून राहू लागला. एक दिवस खंडोबाने सारी मेंढरे मारली व बाणाईच्या पित्यास बाणाईशी लग्न लावल्यास सारी मेंढरे जिवंत करतो असे सांगितले आणि बाणाईचे लग्न या धनगराशी झाले. खंडोबाच्या प्रेमात पडलेली बाणाई या लग्नास अनिच्छुक होती. जेजुरीच्या वाटेवर खंडोबाने आपले खरे रूप बाणाईस दाखविले. बाणाईस बघून म्हाळसा संतप्त झाली. तेव्हा बायकांचे भांडण थांबविण्यासाठी जेजुरी डोंगराचा वरचा भाग म्हाळसेस तर खालचा भाग बाणाईस दिला. म्हणून जेजुरीगडावर म्हाळसेचे मंदिर वर तर बाणाईचे पायथ्यास आहे असे सांगतात.
श्री खंडोबा व म्हाळसा यांची विवाह यात्रा प्रसिद्ध असून, यात्रेसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो भाविक पाल येथील मंदिरात हजेरी लावतात. भाविकांनी दिलेल्या देगणीतून ४ लाख ५१ हजार रुपये किंमतीची ११ किलो चांदी, १ लाख ७२ हजार रुपये किंमतीचे ६६ किलो पितळ आणि जवळपास ७७ हजार रुपये किंमतीचे सागवानाचे लाकूड वापरून सुमारे सात लाख रुपये किंमतीचे आकर्षक सिंहासन तयार करण्यात आले आहे. रविवार हा खंडोबाचा दिवस मानला जातो. सोमवती अमावास्या, चैत्री, श्रावणी व माघी पौर्णिमा, चंपाषष्ठी व महाशिवरात्र या दिवसांना विशेष महत्त्व आहे. मल्हारी-मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला महत्त्व आले असावे. चैत्री पौर्णिमा हा मार्तंड-भैरवाचा अवतारदिन मानला जातो. श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बानूबाई यांचा विवाह झाला, अशी श्रद्धा आहे. माघी पौर्णिमा हा म्हाळसेचा जन्मदिवस असून, मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबा, ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी-मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाल्याची महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील खंडोबाभक्तांची श्रद्धा आहे. बारा प्रसिद्ध स्थाने – (12 khandoba temple) तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
पालीचा खंडोबा यात्रा – (pali khandoba yatra)
खंडोबारायाचे संबंधित विशेष – (pali khandoba mandir)
१) कडे-कऱ्हे पठार, जेजुरी
२) निमगाव
३) पाली-पेंबर सातारा
४) माळेगाव
५) सातारे (औरंगाबाद)
६) शेंगूड (अहमदनगर)
७) नळदुर्ग (धाराशिव-उस्मानाबाद)
८) वाटंबरे
khandoba pali information marathi
View Comments
जय मल्हार
खुपच छान
खुपच छान
अतिशय सुंदर माहिती आहे पण पुजारी नंबर द्यायला पाहिजे
धन्यवाद
Very good information yelkot yelkot Jay mallhar
धन्यवाद माउली
अति सविस्तर व सुंदर माहिती वाचुन फारच मन गद गदुन गेले ।
" येळकोट येळकोट जय मल्हार "
* सदानंदाचा येळकोट *
धन्यवाद माउली??
खुप छान माहिती आहे.
आपण दिलेली माहिती र्सव उत्तम आहे, आपले धन्यवाद.
सुचना.
कृपया,
देवस्थान बद्दल पुर्ण माहीती द्यावी म्हणजे, विस्वथ मंडळ तेथे राहन्याची सोय आसेल तर त्यांचा फोन / संर्पक करन्यासाठी सोईचे होईल. लांबुन येणार्या भावीकांना सोईचे होईल येण्या आगोदर फोन करुन भाविक मुक्कामा साठी जाऊ शकतील, तसेच जेवणाची सोई जवळ पास कोठे आहे किवां घरुन शिदा घेऊन आले तर करुन खान्याची सोय आहे का नाही, ते कळेल.
धन्यवाद.
अतिशय सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद
उत्कृष्ट माहिती दिली आहे
येळ कोट येल कोट जय मल्हार