कान्हो पाठक समाधी मंदिर केंदूर
पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील एक गाव ‘केंदूर‘ या गावी श्री ज्ञानेश्वर महाराज ज्यांना अत्य़ंत आपुलकीने व आदराने ‘काका’ म्हणत असे कान्हुराज वारकरी संप्रदायातील थोर संत होते. कान्हो पाठक हे यर्जुवेदी कुळातील ब्राम्हण होते व त्यांना राजमान्यता ही होती.
सद्गुरु नागेशांनी दृष्टांत देऊन कान्होराजास जंगलात जाऊन साधना करावी अशी आज्ञा केली. त्यानुसार ते केंदूर गावाजवळील पिंपळखोरे येथील जंगलात ओढ्याकाठी एका शिळेवर बसुन तपःश्चर्या करत त्यातुन त्यांना अनेक सिध्दि प्राप्त झाल्या.
श्री संत श्रेष्ठ कान्होराज महारांज केंदूर या गावी ज्या वाड्यात रहात होते तेथे त्यांची समाधी असलेले मंदिर आहे. त्याठिकाणी दर वर्षी पुण्यतिथी उत्सव साजरा केला जातो.
खालीलप्रमाणे वार्षिक उत्सव आहेत
महाशिवरात्र-महाराजांची जयंती
कोजागिरी पोर्णिमा
काकडा भजन
मार्गशीर्ष वद्य चतुर्थी ते त्रयोदशी कान्हुराज महाराज पुण्यतिथी उत्सव. पुण्यतिथी दिवस एकादशी
पंढरपूर पायी वारी सोहळा
प्रत्येक एकादशीला काकडा भजन आणि रात्री हरिजागर.
केंदुरला ऎतिहासीक पार्श्वभुमी असुन पुरातन काळातहि केंदुर बद्द्ल उल्लेख अढळतात.
मस्तानीला श्रीमंत बाजीराव पेशवे (पहिले) यांनी इनाम म्हणुन केंदुर – पाबळ – लोणी हि गावे दिली होती. मस्तानीची कबर पाबळ येथे आहे.
शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: yamaidevi
कान्हो पाठक समाधी मंदिर