काशीविश्वेश्वर मंदिर पळशी ता. पारनेर
अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातपळशी या गावी होळकरांचे दिवाण समाजी यादव कांबळे पळशीकर यांचा भुईकोट किल्ला आहे. पळशी गाव हे भुईकोटातच बसले असल्यामुळे चहुबाजूंनी तटबंदीने वेढलेले हे गाव पाहणेच मुळी एक सुंदर आनंदयोग आहे. हे गाव होळकरांचे दिवाण रामजी यादव कांबळे पळशीकर यांच. त्यांच्या मुलाने म्हणजेच आनंदराव पळशीकर याने पानिपतच्या रणसंग्रामात मोठा पराक्रम गाजवला. त्यामुळे त्यांना हे गाव इनाम मिळाले. मग पळशीकरांनी येथे भुईकोट, विठ्ठल मंदिर, काशीविश्वेश्वर मंदिर व वाडा यांची उभारणी केली.
किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यांनतर गावाच्या मुख्य चौकात काशीविश्वेश्वराचे एक मंदिर आहे. या मंदिराशेजारीच नागेश्वराचे एक छोटेखानी मंदिर देखील आहे. नागेश्वर मंदिरात नागशिल्प व विष्णु-लक्ष्मी ची एक स्थानक मूर्ती आपल्याला दिसून येते. काशीविश्वेश्वर मंदिराचे दगडी काम उल्लेखनीय असून सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. स्तंभ विरहित असलेल्या मंदिराच्या सभामंडपात दोन देवकोष्ठके असून एकात भैरव तर दुसऱ्यात गणेश मूर्ती आहे.
मंदिराच्या भितीतीत खिडक्याही आकर्षक मांडणीच्या आहेत. गाभाऱ्यात सुरेख शिवपिंड आहे. मंदिराच्या मागील भिंतीवर मारुतीचे शिल्प कोरलेले आहे. मंदिरासमोर एक भग्न वीरगळ देखील आपल्याला पहायला मिळते. कधीकाळी पळशीच्या वैभवाची साक्ष असणारे हे मंदिर आज मात्र अतिक्रमणाच्या विळख्यात हरवत चालले आहे. मंदिराच्या मागील भिंतीवर मारुतीचे शिल्प कोरलेले आहे. मंदिरासमोर एक भग्न वीरगळ देखील आपल्याला पहायला मिळते. कधीकाळी पळशीच्या वैभवाची साक्ष असणारे हे मंदिर आज मात्र अतिक्रमणाच्या विळख्यात हरवत चालले आहे.