jejuri

jejuri – तीर्थक्षेत्र जेजुरी

jejuri information in marathi

तीर्थक्षेत्र जेजुरी (jejuri) पुणे जिल्ह्यातील खंडोबाचे हे देवस्थान आहे. हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून जेजुरीचा खंडोबा या नावाने हे सर्वपरिचित आहे. उंच डोंगरावर असलेल्या कडेपठार या ठिकाणी जुने खंडोबाचे स्थान होते. परंतु आता जेजुरी या ठिकाणी नव्याने बांधलेले देऊळ आहे. तरी तेही आता तीन शतकांपूर्वीचे (इ.स.१७१२) देऊळ आहे.

मोगलांच्या सैन्याने मंदिर उद्ध्वस्त केल्याचे इतिहास सांगतो. औरंगजेबाने १,२५,००० चांदीच्या मोहरा देऊन, या देवळातील उठलेल्या पोळ्यातील माशा शांत होण्यासाठी खंडोबालाच साकडे घातले, असाही उल्लेख सापडतो. देवळासमोर दगडी दीपमाळा आहेत. सुमारे 200 पाय-या चढून वर गेल्यावरच मल्हारी मार्तंडाचे म्हणजेच खंडोबाचे दर्शन होते. नवलाख पायरीचा (नऊ लाख पाय-या) डोंगर असेही या देवस्थानच्या डोंगरास म्हटले जाते. देऊळ अतिशय सुंदर आहे.

सभामंडप आणि गाभारा असलेल्या या देवळात खंडोबाची मूर्ती आहे. म्हाळसा, मणिमाला आणि खंडोबा अशा तीन सुबक मूर्ती देवळात आहेत. देवळात तलवार, डमरू आणि परळ या पुरातन वस्तू जतन केलेल्या आहेत. अतिशय जड अशी पुरातन तलवार उचलण्याचा एक अवघड खेळ इथे दरवर्षी खेळला जातो. उंच धरून तलवार जास्तीत जास्त वेळ उचललेली ठेवणा-या व्यक्तीला बक्षिस देण्याची पद्धत आहे. दस-याच्या दिवशी मोठी यात्रा इथे भरते.तसेच सोमवती अमावास्येलाही भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात.


जेजुरीचे मंदिर – (jejuri temple)

हा महाराष्ट्राच्या मंदिरवास्तुकला परंपरेच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. पुण्याजवळच्या जेजुरी ह्या सुमारे तीस मैलावरील गावी खंडोबाचे हे जागृत समजले जाणारे देवस्थान आहे. धनगर, कोळी व इतर अनेक लोकांचे हे आराध्यदैवत असून इ.स. १६०८ मध्ये या देवळाचे बांधकाम झाले. सभामंडप व इतर काम इ.स. १६३७ साली राघो मंबाजी या मराठा सरदाराने केले, तर सभोवारच्या ओवऱ्या व इतर वास्तू होळकरांनी बांधल्या. इ.स. १७४२ मध्ये होळकरांनी दगडी खांब बांधले आणि सभोवारच्या तटबंदीचे व तलावाचे काम इ.स. १७७० मध्ये पूर्ण झाले.

निसर्गाच्या सन्निध्यात नैसर्गिक रित्या वाढणाऱ्या वास्तूकलेचे जेजुरीचा खंडोबाचे देवालय हे उत्तम उदाहरण आहे. खंडोबा हे शिव, भैरव व सूर्य या तीन देवतांचे एकत्रित स्वरूप आहे व म्हणूनच खंडोबाचा उपास रविवार या सूर्याचे वारी करण्याचा प्रघात असावा. कडेपठारावर सुमारे तीनशे मीटर उंच डोंगरावर व पाच किलोमीटर अंतरावर मुख्य देऊळ आहे. किल्लाकोटा हे महत्त्वाचे स्थान खाली आहे.

गेल्या अनेक शतकात धनगर व इतर जमातींच्या भक्तांनी दगडी पायऱ्या, दीपमाळा, व कमानी उभारल्या आहेत. या सर्व बांधकामात मराठी वास्तुकला व निसर्गाशी समरसता दिसून येते. दीपमाळांचे अनेक प्रकार, कमानीवरील उत्तम भित्तिचित्रे व नक्षी हे पाहिल्यावर जेजुरीच्या गतवैभवाची थोडी कल्पना येते.


देऊळ व परिसर – जेजुरी (jejuri mandir) 

जेजुरीचे शिखर व समोरच्या मोठ्या दगडी कमानी यांचे प्रमाण व तोल मराठी वास्तुकारांनी उत्तम साधला होता. दुर्दैवाने शिखर-शिंगणापूर तीर्थक्षेत्राप्रमाणेच येथेही दाक्षिणात्य शैलीचे या वास्तूशी पूर्ण विशोभित शिखर नव्याने बांधण्यात आले आहे. देवळाच्या ओवऱ्या व समोरचा ओटा यांवर टोकदार दगडी कमानी आहेत.

देवळात प्रवेश करताना उत्तरेच्या दरवाजावरच देवाचा नगारखाना आहे. पूर्वाभिमुख देवळासमोर सात मीटर व्यासाचे आणि पितळी पत्र्याने मढवलेले मोठे कासव आहे. यावर भंडारा व खोबरे उधळण्याचा नवस फार लोक करतात. चांगभले खंडोबांचा येळकोट असा जयघोष करीत या भंडाऱ्यांची उधळण होते. तळी भरणे हा एक विधी असतो. ताटात खोबरे व भंडारा घ्यावयाचा, पूजा करून तळी त्रिवार डोक्यावर घ्यावयाची व मग खोबऱ्याची उधळण करावयाची.

खंडोबा ही सकाम देवता आहे. नाना फडणवीस यांनी नवसाप्रीत्यर्थ एक लाख रुपये देवाला वाहिले होते. पंचवीस हजाराच्या मूर्ती केल्या, दगडी मंडपी रुप्याने मढवली व उरलेल्या रकमेतून सोन्याचे मुखवटे वगैरे सामग्री वाहिली. मंदिरात चांदी-पितळेचे तीन मूर्ति-जोड होते. एक सोन्याचा जोड इ.स. १९४२ च्या सुमारास चोरीला गेला; बाकी शिल्लक आहेत.


जेजुरीचे ऐतिहासिक महत्व – जेजुरी (jejuri photo)

सह्याद्रीच्या डोंगर रांगा मध्ये घनदाट जंगलात असलेली ही लवमुनीची तपोभुमी दक्षिणे मध्ये मणि मल्ल राक्षसांचे छळाला कंटाळून विस्थापित झालेल्या ऋषीनी येथील लव आश्रमात आश्रय घेतला व मल्ल राक्षसांचे छळा पासून मुक्त करण्याची शंकरांना विनवणी केली.शंकरांनी या भूमीवर मार्तंड भेंरव अवतार धारण केला. ही भुमी पवित्र झाली. मणि मल्ल वधा नंतर मार्तंडानी येथेच आपली राजधानी वसवली आणि ही भुमी जयाद्री म्हणून प्रसिद्ध पावली.

मार्तंड भेंरवाचे अवतार कार्य संपले आणि अनंतकाळ लोटला कडेपठारी प्रस्थानपिठी मार्तंड भेंरव मंदिरात नांदतच होते.येथेही राजधानी ठिकाणी मार्तंड भेंरवाचे मंदिर उभे राहिले. मंदिरांचे व्यवस्थेसाठी दाने इनामे दिली गेली आणि जयाद्री ची जेजुरी नगरी वसली. लोकश्रद्धा भक्तीतून तिचे वैभव वाढत राहिले.येथे अनाम भक्तांनी मंदिराची अनेक कामे केली व भव्य मंदिर उभे राहिले. गडावरील मंदिराचे गर्भगृहाचे बाहेरील बाजूस असेलेल्या यक्षमूर्ती खाली मात्र एक भक्त आपली नाममुद्रा सोडून गेला ईस १२४६ चा हा येथील ज्ञात असलेला पहिला शिलालेख

गडाचे पूर्वेचा लोक वस्तीचा भाग जुनी जेजुरी म्हणून ओळखला जातो.पण पायरी मार्ग, कमानी यांचा विचारकरता येथील पायथ्याचे पहिल्या कमानीवर ईस १५११ चा शिलालेख आहे या वरून उत्तरे कडील लोकवस्ती या पूर्वीपासून प्रमुख लोकवस्ती म्हणून अस्तित्वात होते हे निश्चीत.

ईस १५११ मधेच चेंतन्य महाप्रभू नामक बंगाली संताने जेजुरीस भेट दिल्याचे वर्णन आहे या वर्णनात येथे मुरुळीची संख्या मोठी होती व महाप्रभूनी त्यांचे प्रबोधन केल्याचा उल्लेख आहे.एक बंगाली महापुरुष जेजुरीस भेट देतो यावरून याकाळी जेजुरी क्षेत्र म्हणून प्रसिद्ध होती हे निश्चीत.

प्रसिद्ध पावत असलेल्या या जेजुरीच (jejuri) महात्म्य शब्दबद्ध करण्याच काम याच काळात ईस १५४० च्या दरम्यान ज्ञानदेव या लेखकाने “जयाद्री महात्म्य ” या ग्रंथाचे माधमातून केले. ईस १६०८ मध्ये येथील लवथळेश्वर मंदिराचे दुरुस्तीचे काम झालेचें तेथील शिलालेखा वरून समजते. ईस १६५१ – ५२ चें दरम्यान जेजुरी मंदिराच्या पुजाऱ्या मध्ये वादविवाद सुरु झाले व ते जिजाऊ साहेबाकडे कडे निवाड्या साठी गेले जिजाऊनी निवाडा देऊन वाद मिटवले, पुढे ईस १६५३ मध्ये हाच निवाडा शिवाजी महाराजांनी कायम केला.


एकांतात वसलेले खंडोबाचे कडेपठार – जेजुरी (khandoba jejuri)

सदानंदाचा येळकोट’, ‘येळकोट, येळकोट जयमल्हार’, ‘खंडोबाच्या नावानं चांगभलं’, अशी आरोळी अन् सोबत उधळलं जाणारं भंडार-खोबरं… हे चित्र दिसलं, की लोकदेव खंडोबा, मल्हारी, म्हाळसाकांताची आराधना सुरू आहे, हे लक्षात येईल. या मल्हारी-म्हाळसाकांताची अनेक स्थानं असली, तरी पंढरपूरचा विठोबा, कोल्हापूरचा जोतिबा अन् जेजुरीचा (jejuri) खंडोबा, हीच ओळख जन-मानसांत रुजली आहे. तरी, जेजुरगडाच्या (jejuri) मागे उंच डोंगरावर असलेलं कडेपठार (कऱ्हेपठार) हे खंडोबाचं मूळ स्थान आहे,

याची माहिती फारशी नसते. जेजुरीचं दर्शन घेऊन आल्याचं सांगणाऱ्या भाविकांच्या चेहऱ्यावर ‘कडेपठारचं मूळ स्थान पाहिलं का’, असं विचारल्यावर मात्र ‘हे काय नवीन,’ अशी भावना दिसते. त्यामुळं जेजुरीला जाणाऱ्या भक्तांनी खंडोबाचं हे मूळ ठिकाण पाहायलाचं हवं. जेजुरीपेक्षा (jejuri) इथं पोहोचणे थोडं खडतर असलं, वाट थोडी अवघड असली, तरी देवाच्या आद्यस्थानाचं दर्शन त्यांना सुखावणारं असेल, यात शंका नाही.

कडेपठाराच्या डोंगराच्या पायथ्याला वाहनतळ आहे. तेथून, पायऱ्यांची चढण पार करून आपण कडेपठारावरील मंदिराच्या मूळ प्रांगणात पोहोचतो. जेजुरीच्या (jejuri) तुलनेत मंदिर लहान असले, तरी आकर्षक आहे. या पूर्वाभिमुखी मंदिराच्या बाहेर मेघडंबरीत नंदी, तर पुढे कासव आहे. जेजुरीप्रमाणे (jejuri) या मंदिराचेही सोपा, सभामंडप आणि गाभारा, असे तीन भाग आहेत.

गाभाऱ्यात पश्चिम भिंतीतल्या देवळीत खंडोबाची आसनस्थ मूर्ती आहे. बैठकीच्या डाव्या-उजव्या बाजूला मणि आणि मल्ल यांची मुंडकी. मूर्तीच्या हातात खड्ग, त्रिशूळ, डमरू आणि परळ अशी आयुधे. तर, देवळीसमोरील जमिनीवर दोन स्वयंभू, खडबडीत व अनियमित आकाराची खंडोबा व म्हाळसा यांची लिंगं आहेत. त्याशिवाय, खंडोबा व म्हाळसा आणि बाणाईच्या उभ्या मूर्तीही आहेत.


जेजुरी गडाचे वैशिष्ट नऊ लाख पायरी – जेजुरी (jejuri)

पंढरपूरचा विठोबा आणि जेजुरीचा (jejuri) खंडोबा हे महा-राष्ट्राचे लोकदेव. सकल संतांनी आपला श्रद्धाभाव विठ्ठलाच्या ठायी समर्पित केला आहे. धर्म, पंथ संप्रदायाच्या चौकटी बाजूला सारून अद्वैताच्या भूमिकेतून या लोक-देवतेला स्वीकारले आणि आपल्या अभंगवाणीतून शब्दवैभवाने तिला सारस्वतात मिरवले; तर लोक-कलावंतांनी लोकवाणीतून खंडेरायाचे निरुपण करीत त्याचे जागरण मांडले. लोकवाणीतून उभे केलेले खंडोबाचे वर्णन हे त्याचे भावदर्शन आहे. परमात्मा हा ज्ञानदर्शनापेक्षाही भावदर्शनाने खूप जवळचा वाटतो. अनेक लोकगीतां-तून खंडेरायाचे महात्म्य सांगताना म्हटले जाते, देवा तुझी सोन्याची जेजुरी (jejuri) । गडाला नऊ लाख पायरी।।

गडाची नऊ लाख पायरी ही संकल्पना अजब आहे. ‘नऊ लाख पायरी’ म्हणजे नेमके काय असा प्रश्न मला नेहमी पडे. काहीजण म्हणायचे जिथे खंडोबाचे मुख्य ठिकाण आहे, तो जेजुरी (jejuri) गड पूवीर् खूप मोठा होता. त्याला त्यावेळी नऊ लाख पायऱ्या असतील. नंतर पडझड झाली. गड लहान झाला. तर काही सांगायचे, की नऊ लाख पायऱ्या म्हणजे नऊ लाख दगड असतील. आता नऊ लाख दगड असणाऱ्या पायऱ्या किंवा प्रत्यक्षात तेवढ्या पायऱ्या असणारा गड किती उंच असायला हवा, याची कल्पनाच करवत नाही. संत एकनाथ महाराजांच्या एका भारुडात मला याचे उत्तर मिळाले. नाथांनी खंडोबावर लिहिलेल्या भारुडात म्हटले आहे, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी। आत्मनिवेदन भरीत रोडगा निवतील हारोहारी।


खंडोबारायाचे संबंधित विशेष – जेजुरी (jejuri)

येळकोट येळकोट जय मल्हार, सदा नंदाचा येळकोट.

रविवार हा खंडोबाचा दिवस मानला जातो. सोमवती अमावास्या, चैत्री, श्रावणी व माघी पौर्णिमा, चंपाषष्ठी व महाशिवरात्र या दिवसांना विशेष महत्त्व आहे. मल्हारी-मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला महत्त्व आले असावे. चैत्री पौर्णिमा हा मार्तंड-भैरवाचा अवतारदिन मानला जातो. श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बानूबाई यांचा विवाह झाला, अशी श्रद्धा आहे. माघी पौर्णिमा हा म्हाळसेचा जन्मदिवस असून, मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबा, ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी-मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाल्याची महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील खंडोबाभक्तांची श्रद्धा आहे.

खंडोबाच्या उपासनेत भंडारा (हळदीची पूड) फार महत्त्वाचा आहे. खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी ठोम्बरा (जोंधळे शिजवून त्यात दही व मीठ घातलेले), कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात. देवाला नैवेद्य देण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो.

तळी भरणे म्हणजे एका ताह्मणात विड्याची पाने, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताह्मण “सदानंदाचा येळकोट’ किंवा “येळकोट येळकोट जय मल्हार’ असे मोठ्याने तीन वेळा म्हणत उचलतात, नंतर दिवटी-बुधली घेऊन आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळून प्रसाद वाटला जातो.

खंडोबाला नवस बोलणे व फेडणे याला महत्त्व आहे. त्यातील काही सौम्य नवस असे- मौल्यवान वस्तू देवास अर्पण करणे. दीपमाळा बांधणे. मंदिर बांधणे किंवा जीर्णोद्धार करणे. पायर्‍या बांधणे, ओवरी बांधणे. देवावर चौरी ढाळणे, खेटे घालणे म्हणजे ठरावीक दिवशी देवदर्शनास जाणे. पाण्याच्या कावडी घालणे. उसाच्या किंवा जोंधळ्याच्या ताटांच्या मखरांत प्रतीकात्मक देवाची स्थापना करून वाघ्या-मुरळीकडून देवाची गाणी म्हणवणे, यालाच जागरण किंवा गोंधळ असेही म्हणतात. देवाची गदा म्हणजे वारी मागणे. तळी भरणे, उचलणे, दही-भाताची पूजा देवास बांधणे. पुरण-वरण व रोडग्याचा नैवेद्य करून ब्राह्मण, गुरव व वाघ्या-मुरळी यांना भोजन घालणे. कान टोचणे, जावळ, शेंडी आदी विधी करणे. खोबरे-भंडारा उधळणे, देवाच्या मूर्ती विकणे.


श्री खंडोबारायाची पाच प्रतीके – जेजुरी (jejuri)

लिंग : हे स्वयंभू, अचल अगर घडीव असते. तांदळा : ही एक प्रकारची चल शिळा असून, टोकाखाली निमुळती होत जाते. मुखवटे : हे कापडी किंवा पिटली असतात. मूर्ती : या उभ्या, बैठ्या, घोड्यावर. तर काही धातूच्या किंवा दगडाच्याही आढळतात. टाक : घरात पूजेसाठी सोन्याच्या किंवा चांदीच्या पत्र्यावर बनवलेल्या प्रतिमा.

खंडेरायाच्या जेजुरीत (jejuri) दरवर्षीप्रमाणे पारंपारिक पद्धतीने ‘मर्दानी दसऱ्याचे’ आयोजन करण्यात आले येतात. तब्बल 15 तासांपेक्षाही जास्त काळ हा सोहळा चालतो. तब्बल 42 किलोंची तलवार एका हातात जास्तीत जास्त वेळ तोलून धरण्याची आणि दातात उचलून मर्दानी खेळ दाखवण्याची स्पर्धा या ठिकाणी रंगते.

या उत्सवादरम्यान जेजुरी (jejuri) हळदीने न्हाऊन निघते. जेजुरीचा हा उत्सव जगप्रसिध्द आहे. अनेक परदेशी नागरिकही हा सोहळा पाहण्यासाठी येतात. यळकोट यळकोट जय मल्हारच्या गजराने यावेळी गड दुमदुमून निघतो. खंडोबाला शंकराचे अवतार म्हटले जाते. येथे भाविक डोंगरावर अनेक पायऱ्या चढून येतात.


खंडोबाची स्थाने – जेजुरी (jejuri)

  • अणदूर (नळदुर्ग) (उस्मानाबाद)
  • जेजुरी (पुणे)
  • देवरगुड्डा (राणीबेन्नूर)
  • निमगाव धावडी (पुणे)
  • पाली (सातारा)
  • मंगसुळी (बेळगाव)
  • माळेगाव (नांदेड)
  • आदि मैलार (बिदर)
  • मैलारपूर (यादगीर) (गुलबर्गा)
  • मैलार लिंगप्पा (खानापूर) (बेल्लारी)
  • शेगुड (अहमदनगर)
  • सातारे (औरंगाबाद)

तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 

jejuri khandoba

1 thought on “jejuri – तीर्थक्षेत्र जेजुरी”

  1. छान वाटली माहिती बरेच ज्ञान मिळाले खूप बरं वाटलं आम्ही आलो जाऊन पण इकडे जास्त माहिती समजली नवलाख पायरी बदल नाही समजलं सदानंदाचा यळकोट यळकोट यळकोट जय मल्हार

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *