तीर्थक्षेत्र

संत जनाबाई मंदिर

संत जनाबाई मंदिर गंगाखेड

हा भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या परभणी जिल्ह्यातील एक तालुका आहे. हे गाव गोदावरी नदीच्या तीरावर वसले आहे. गोदावरी नदीच्या काठावर वसलेला गंगाखेड तालुका हा संत जनाबाईचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. गंगाखेड येथे संत जनाबाई यांचे मंदिर ही आहे. तसेच या गावात गोदावरी नदीच्या काठावर अनेक लहान मोठी मंदिरे आहेत. प्राचीन इतिहास असलेल्या या गावात अनेक जुन्या घरांचे राजवाड्यांचे अवशेष सापडतात. गोदावरी नदीकडील परिसरातील अनेक घरांचे बांधकामे ही जुन्या पद्धतीची आणि दगडांनी बनलेली आहेत. जस जसा गंगाखेड चा विस्तार होत गेला. तस तशा या गावात अनेक नवनवीन पद्धतीची बांधकामे होण्यास सुरुवात झाली आणि नवीन वस्त्या तयार झाल्या आहेत.

गंगाखेड तालुका हा महाराष्ट्र राज्यातील परभणी जिल्ह्यात गोदावरी नदीवर वसलेला आहे. येथे संत जनाबाई महाविद्यालय आहे. हा तालुका परळीपासून ३५ कि.मी. अंतरावर आहे. गंगाखेड येथे मन्मथ स्वामी यांचे ही मोठे मंदिर आहे. गंगाखेड हे गाव दक्षीण काशी म्हणूनही ओळखले जाते.

गंगाखेड शहरातील ग्यानु मामा यांची कलम संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. येथील लोक कोणत्याही कार्यक्रमासाठी दुसऱ्या कुठल्याही मिठाई पेक्षा कलम ही मिठाई जास्त पसंद करतात. गंगाखेड मध्ये सोमवार बाजार भरतो, या आठवडी बाजारात वेगवेगळ्या प्रकारची दुकाने मांडली जातात. तसेच तालुक्यातील बहुतांश गावातील लोक आठवडी बाजार करण्यासाठी गंगाखेड येथे जमा होतात, त्यामुळे गंगाखेड शहर व बाजारपेठ समृद्ध झाले आहे.


शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref: wikipedia