श्री दशभुजा दत्तमंदिर, लोणी भापकर

श्री दशभुजा दत्तमंदिर, लोणी भापकर

स्थान: लोणी भापकर, तालुका बारामती, जिल्हा पुणे.
त्पुरूष: श्री दत्तानंद सरस्वती स्वामी महाराज.
विशेष: दशभुजा दत्तमूर्ती, पुरातत्व विभागाकडून संरक्षित वस्तू, दगडी मंदिर.

“श्री दशभुजा दत्तमंदिर” हे स्थान लोणीभापर, तालुका बारामती, जि. पुणे या गावाच्या पश्चिमेस सुमारे ३ फर्लांगावर, अतिशय प्राचीन श्रीशैल्यमल्लिकार्जुन देवालयाच्या सन्मुख लगतच्या भव्य मोठ्या दगडी बांधलेल्या मंदिराच्या आतील पश्चिमभागी आहे. श्रीदत्ताच्यापादुकांची स्थापना शके १८३० चैत्र शुद्ध, गुरुवार रोजी सन १९०८ या दिवसाच्या समुहूर्तावर पहाटे ब्रह्मीभूत सद्गुरू दत्तानंदसरस्वतीस्वामी महाराज यांनी केली. या देवळाची (शिखराची) उंची सुमारे ३० फूट असून औरसचौरस घेर २५ x २५ फूट आहे. त्यामध्येच देवास प्रदक्षिणा घालण्याकरता व्यवस्था आहे. तसेच त्यांच्यामागे तीन ओवऱ्या बांधल्या असून देवळाच्या मागे बरोबर मध्यावर औदुंबर (कल्पवृक्ष) आहे. ओवऱ्यांचा उपयोग श्रीगुरुचरित्रपारायणाकरता व सेवेकऱ्यास रहाण्यास करतात.

श्रीमंदिराचे पूर्वद्वार पूर्वेकडे असून मंदिराच्या आतील भागी मध्यावर श्रीदत्तपादुकांची स्थापना केलेली आहे. पादुकांच्या मागे सुमारे ४ फुटांवर उत्तम प्रकारच्या दगडी सिंहासनावर मध्यभागी श्रीदत्तमूर्ती बसविल्या आहेत. तिची प्राणप्रतिष्ठा शके १८५० मार्गशीर्ष १५ रोजी गुरुवार सन १९२८ या शुभदिनी सूर्योदयाबरोबर झाली. पूर्वेस दगडी मंडप तीनही बाजूंस आहेत. श्रीदत्ताची मूर्ती २॥ फूट उंचीची मोहक असून प्रत्येक हातात आयुधे दिलेली आहेत. मूर्ती संगमरवरी दगडाची जयपुराहून आणली आहे.

या दत्तस्थानाशी श्रीदत्तानंदसरस्वतींचा संबंध आहे. श्रीदत्त-नृसिंहसरस्वती-पूर्णानंद-कृष्णानंद अशी त्यांची परंपरा सांगितली जाते. मल्लिकार्जुनमंदिर सद्गुरू येण्यापूर्वी ओसाड व अत्यंत भयानक होते. देवाचे दर्शनास भीतीमुळे कोणीही जात नव्हते. देवालयाचे भोवताली फारच उंचउंच निवडुंग, सर्प व दाट झाडी होती. अशा त्या निवांत स्थळी सद्गुरूंनी येऊन मुक्काम ठोकला. ही बातमी गावात पसरताच सर्व लोक त्यांचे दर्शनास येऊ लागले.

दशभुजा दत्तमूर्ती हि क्वचितच आढळते पण तशी दत्तमूर्ती येथे आढळते. सादर मंदिर पुरातत्व विभागा मार्फत जतन केले जाते. हे स्थान अत्यंत जागृत असून हजारो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. अनेक भक्त येथे येऊन गुरुचरित्र पारायण, भजन, कीर्तन सेवा अर्पण करतात. श्री दत्तानंद स्वामी महाराजांनी या ठिकाणी अनेक चमत्कार केले. त्यांचा चरित्राची ७ अध्यायाची प्रासादिक पोथी आहे अनेक भक्त ती नियमित वाचतात. या मंदिरात एक देवीचे स्थान आहे. अनेक भक्त येथे नवस बोलतात व ते पूर्ण होतात.

दशभुजा दत्तमूर्ती हि क्वचितच आढळते पण तशी दत्तमूर्ती येथे आढळते. सादर मंदिर पुरातत्व विभागा मार्फत जतन केले जाते. हे स्थान अत्यंत जागृत असून हजारो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. अनेक भक्त येथे येऊन गुरुचरित्र पारायण, भजन, कीर्तन सेवा अर्पण करतात. श्री दत्तानंद स्वामी महाराजांनी या ठिकाणी अनेक चमत्कार केले. त्यांचा चरित्राची ७ अध्यायाची प्रासादिक पोथी आहे अनेक भक्त ती नियमित वाचतात. या मंदिरात एक देवीचे स्थान आहे. अनेक भक्त येथे नवस बोलतात व ते पूर्ण होतात.

श्रीदत्तानंदसरस्वती यांचे जन्मगाव, राहण्याचे ठिकाण वगैरे काहीही माहिती मिळत नाही. इंग्रजांच्या राज्यात डांग देशातील बंडाळीचा बंदोबस्त करण्याकरिता, त्यांना एक मोठा सैन्यावरील अधिकारी म्हणून पाठविले. त्याच समयी श्रीअक्कलकोटच्या स्वामींची व त्यांची भेट झाली व लगेच उपदेशही मिळाला. अत्यंत नास्तिक असूनही स्वामींची व त्यांची दृष्टादृष्ट होताच त्यांचा सर्व नास्तिकपणा नाहीसा झाला.
ते शरीराने चांगले धष्टपुष्ट, उंच व गौरवर्णाचे आणि अत्यंत करारी होते. लहान मुलांबरोबर खेळणे त्यांस फार आवडे. वानप्रस्थ स्विकारल्यानंतर नेपाळ प्रांतातून फिरत फिरत ते दक्षिण भागात म्हणजे पुण्यास उतरले. त्यावेळी त्यांचे समवेत श्रीनृसिंहसरस्वती आळंदीचे, जंगलीमहाराज भांबूर्डा असे होते. सोमयाचे करंजे येथे ते आले व तेथून लोणीस प्रकट झाले व शके १८३८ फाल्गुन व॥ त्रयोदशी इ. स. १९१६ या वर्षी बुधवारी सकाळी ६ वाजणेचे सुमारास त्यांनी समाधी घेतली.


श्री दशभुजा दत्तमंदिर, लोणी भापकर माहिती समाप्त.


संक्षिप्त श्री गुरुचरित्र विकत घेण्यासाठी संपर्क करा  :७२१८२७४९७४