तीर्थक्षेत्र

संत दामाजी पंत मंदिर

संत दामाजी पंत मंदिर – मंगळवेढा

मंगळवेढयाचे सर्व संतापेक्षा श्री दामाजीपंतांची प्रसिध्दी फार आहे. त्यांचेच नावाने ही नगरी ओळखली जाते. इ.स. १४४८ ते १४६० ही दोन वर्षे श्री दामाजीचा दुष्काळ म्हणून ओळखली जातात. याच काळात दामाजीपंतानी मंगळवेढे येथे तहसीलदार असताना बिदर बादशहाचे अवकृपेची भिती न बाळगता सरकारी कोठारातील धान्य भुके ने व्याकूळ झालेल्या व मरणोन्मुख झालेल्यांना फुकट वाटले व लाखो लोकांचे जीव दुष्काळ समयी जगविले. बादशहाने या गुन्ह्याबद्दल श्री दामाजीपंतांना पकडून बिदर ला नेले. पण संकटकाळी भक्तांचा पाठीराखा पंढरीचा पांडूरंग विठू महाराचे रुप घेऊन बिदर दरबारात गेला व सहाशॆ खंडी धान्याचे एक लक्ष वीस हजार मोहरा भरून पावती घेऊन आला. त्यामूळे श्री दामाजीपंताना बिदर दरबारात हजर करताच बादशहाने त्यांचा सत्कार करून त्यांना बंधनमुक्त केले व तुमचे विठू महाराने तुमचे पैसे पोचते केलेचे बादशहाने सांगितले. श्री दामाजीपंतांना आश्चर्य वाटले व कोण विठू महार व आपणास सोडवण्यासाठी कोण आले होते याबद्द्ल त्यांना विस्मय वाटला. पंढरीच्या पांडूरंगाची ही कृपा झाल्याची त्यांना खात्री पटताच त्यांनी नौकरीचा राजीनाम तात्काळ दिला व राहीलेले आयुष्य पांडूरंगाच्या सेवेत खर्च केले. प्राणाची पर्वा न करता दुष्काळपिडीत लोकांची सेवा केली म्हणून त्यांचे नाव अजरामर झाले आहे

संत दामाजी पंत मंदिर – दामाजी मंदीरातील श्री विठ्ठल रुक्मिणी व श्री दामाजीपंताची मुर्ती


शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref: marathi.mangalwedha