बनेश्वर मंदिर तळेगाव दाभाडे

बनेश्वर मंदिर तळेगाव दाभाडे – bneshwar mandir talegav dabhade

बनेश्वर मंदिर तळेगाव दाभाडे

बनेश्वर नावाची पुणे जिल्ह्यात दोन शिव मंदिरे आहेत. त्यातील एक म्हणजे खुप नावाजलेले व र्वांना परिचयाचे म्हणजे पुण्याजवळील नसरापुर येथील बनेश्वर मंदिर इथे नेहमी पर्यटकांची गर्दी असते. तर त्याच्या विरुद्ध असलेले अजुन एक बनेश्वर मंदिर म्हणजे तळेगाव दाभाडे येथील बनेश्वर मंदिर हे खुप प्रचिन मंदिर असून पर्यटकांपासून वंचित त्याची सुंदरता आज पण टिकून आहे. या मंदिराचे बांधकाम हे शुर पराक्रमी सरदार खंडेराव दाभाडेच्या काळातले आहे. शिव शंभोचे भक्त असल्यामुळे त्यांनी बऱ्याच ठिकाणी शिव शंकराची मंदिरे उभारली आहेत. त्यातीलच हे एक मंदिर

मंदिराचा आजुबाजुचा परिसर हा शेती तसेच मनुष्य वस्तीचा असला तरी मनाला शांती व नवचेतन्य देणारा आहे. मंदिराजवळ प्रवेश करताना पहिल्या अनेक समाधी (वीरगळ) दिसतात तर उजव्या बाजुला भारतातील पहिल्या महिला सरसेनापती उमाबाईसाहेब दाभाडे सरकार यांची समाणी दिसते; गेट मधुन आत प्रवेश करताच समोर नंदीमंडप दिसतो. चार खांबावर उभा असलेला नदी खूप सुरेख असून लक्ष वेधुन घेईल अशीच त्याची घडण आहे. तसेच याच नदिमंडपा शेजारी लागुन छोटे बांधीव तळे म्हणा अथवा पुष्करणी त्याची रचना सुद्धा खुप छान बांधीव दगठानी घडवलेली आहे.

या पुष्करणीत उतण्यासाठी चारही बाजुनी पायन्यांची निर्मिती केलेली आहे. याच पुष्करणीला पाणी उपसाण्यासाठी मोटेची बांधणी केलेली आढळते. त्यातील पाण्याचा वापर पूर्वी शेतीसाठी तसेच पिण्यासाठी केला. जात असावा. पण आताच्या काळात हे पाणी वापरण्याजोगे किंवा पिण्याजोगे नसल्याने या पुष्करणीला नासके तळे असे देखिल नाव मिळाले. ते काही ही असेना पण ही पुष्करणी खरच मनाच्या कोपऱ्यात घर नक्की करते.

बनेश्वर मंदिराची रचना ही १६ खांबावर केलेली आहे. संपुर्ण दगडात उभारलेली मंदिराची रचना व त्यावर केलेले रंग काम तुम्हाला मोहात पाडायला मजबुर करते. यातील कोणत्याच खांबावर नक्षी काम नाही पण त्याची रचना बघण्या सारखी आहे. छोट्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर डाव्याबाजुला कोनाड्यात देवीची व उजव्या बाजुच्या कोनाड्यात श्री गणेशाची मुर्ती दिसते. तर मंदाराच्या सभामंडपात एक नगारा देखिल आहे. हे सगळे बघून जेव्हा आपण मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करतो तेव्हा नवचैतन्याची अनुभती येते.

मग या धीरगंभीर वातावरणात आपण कधी हरवुन जातो ते कळतच नाही. ह्या सगळ्यातून बाहेर पडावे असे वाटतच नाही . प्रत्येकाने एकदा तरी ही अनुभवाची शिदोरी अनुभवा असेच हे मंदिर आहे. याच मंदिराला लागुन सरदार खंडेराव दाभाडे सरकार यांची समाधी आहे. ती सुध्दा पाहण्यासारखी आहे .धीतरी वेळ काढुन या ठिकाणी भेट द्यावी असेच हे ठिकाण एक नवचैतन्याची अनुभुती तर एका बाजुला पराक्रमाची उम्मीद देणाऱ्या वीराची समाधी.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *