bhimashankar information in marathi
भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे .भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते, अशी श्रद्धा आहे.. भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. १९८४ साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात. येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू. म्हणजे उडणारी खार. येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलातच आढळते. बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वनविभागाने विविध योजना अवलंबल्या आहेत. अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे. येथील इतर प्रेक्षणीय स्थळे.
गुप्त भीमाशंकर – भीमानदीचे मूळ उगम ज्योतिर्लिंगात आहे, परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे १.५ किमी पूर्वेला पुन्हा प्रकटते असे मानले जाते. ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते.
कोकण कडा– भीमाशंकर मंदिराजवळच पश्चिमेला हा कडा असून त्याची उंची साधारणपणे ११०० मीटर इतकी आहे. येथून अतिशय विहंगम असे दृश्य दिसते. अतिशय स्वच्छ वातावरणात पश्चिमेकडचा अरबीसमुद्रही दिसू शकतो.
सीतारामबाबा आश्रम– कोकणकड्यापासून एक रस्ता या आश्रमाकडे जातो. घनदाट जंगलात हे ठिकाण आहे. गाडीने या ठिकाणी पोहोचता येते
नागफणी – आश्रमापासून नागफणीला जायला पायवाट आहे. हे ठिकाण अभयारण्यातील सर्वात उंच ठिकाण असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून १२३० मीटर इतकी आहे. कोकण व परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते. कोकणातून हे शिखर नागाच्या फण्याप्रमाणे दिसते म्हणून नागफणी असे नाव पडले आहे.
भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी सहावे भीमाशंकर-ज्योतिर्लिंग हे पुण्यापासून १२७ कि.मी. अंतरावर वसले असून ते भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याच्या परिक्षेत्रात येते.
महाशिवरात्र (24 फेब्रुवारी शुक्रवार) महादेवाच्या उपासनेचा सर्वात खास दिवस आहे. भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी सहावे ज्योर्तिलिंग म्हणजे ‘भीमाशंकर’. निर्सगाने मुक्त हस्ताने उधळून करून या परिसराला सजवले आहे. सह्याद्रीच्या पश्चिकडील पसरलेल्या एका रांगेवरील उंच डोंगरावर भीमाशंकर आहे. प्रचंड गर्द झाडी, जंगल व उंच डोंगराच्या कुशीत भीमाशंकराचे मंदिर वसलेले आहे. निसर्गातील डोंगराच्या कोंदणात लपलेले हे मंदिर पाहण्याचा नुकताच योग आला त्या विषयी…..
सरत्या वर्षाच्या चौथ्या रविवारी सकाळी संपूर्ण परिवारासह भीमाशंकरला जाण्याचा बºयाच वर्षांनी योग आला. मंचरमार्गे भीमाशंकरला अवघ्या अडीच तासात पोहचलो. येथील निसर्गरम्य परिसर, शांत वातावरणामुळे मन प्रसन्न झाले. भीमाशंकरचे मंदिर हे डोंगराच्या कुशीत वसलेले आहे. इतर मंदिरांप्रमाणे या मंदिर डोंगरावर नसून डोंगराच्या कोंदणात असल्याने सुमारे ३०० ते ३५० पायºया उतरून मंदिरात जाता येते. गाडीतळावर गाडी पार्क करून मी खाली उतरायला सुरवात केली. दहाच मिनिटात मंदिरासमोर पोहोचला देखील. आईला जास्त चालता येत नसल्याने प्रथम आम्ही डोली करणार होतो.
मात्र, डोलीवाल्याने ६०० रुपये सांगितल्यावर जमेल तेवढे चालून मग डोली करण्याचा विचार आईने केला. मंदिराच्या बाहेर ट्रॅक्स आलेली पाहून मला आश्चर्य वाटले. आजुबाजूला चौकशी केल्यावर गाडीतळाशेजारून एक कच्चा रस्ता मंदिरापर्यंत पोहोचतो असल्याचे समजले. मात्र गर्दीच्या वेळी हा रस्ता बंद असतो. कारण जायला व यायला अगदीच जेमतेम फोरव्हिलर बसेल एवढीच जागा मिळते. शिवाय कच्चा रस्ता, दगडधोंड्याचा असल्याने गाडीची वाट लागण्याचीही शक्यता आहे. आम्ही गेलो तेव्हा विशेष म्हणजे गर्दी नसल्यामुळे गाडीने आईला खाली घेऊन येण्यासाठी मी पुन्हा माघारी फिरलो. दहाच मिनिटात गाडीने मंदिरापाशी पोहाचलो.
इतर स्थळांप्रमाणे या ठिकाणी पौराणिक गोष्टी व त्यावरून पडलेले या ठिकाणाचे नाव याही ठिकाणी आपल्याला ऐकावयास मिळते. पुराणात त्रिपुरासुराचा वध करून भगवान शंकर विश्रांतीसाठी येथे आले असता तेथे अयोध्येचा ‘भीमक’ नावाचा राजा तप करीत होता. शंकराने प्रसन्न होऊन भीमकास वर मागण्यास सांगितले. त्यावेळी त्याने ‘शंकराला आलेल्या घामाच्या धारांची नदी होऊ दे’, असा वर मागितला व त्याप्रमाणे भीमेचा उगम झाला व भीमक राजाच्या नावावरून या नदीस भीमा हे नाव पडले, अशी आख्यायिका आहे. दुसरी एक कथा अजून सांगितली जाते त्रिपुरासूर नावाच्या दैत्याने या भागात फारच धुमाकूळ घातला होता. त्याचा नाश करण्यासाठी शंकरांनी प्रचंड असे भीमरूप धारण केले. अनेक रात्र चाललेल्या या युद्धात त्रिपुरासूराचा वध केला. शंकर घामाघूम होऊन येथील शिखरावर बसले. अंगातून निघणाºया घामाच्या धारेतून ‘भीमा’ नदी उत्पन्न झाली.
हेमाडपंती पद्धतीचे हे मंदिर सुमारे १२०० ते १४०० वर्षांपूवीचे आहे. मंदिराच्या छतावर, खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते. मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या मूर्ती रेखीव व सुंदर आहेत. सभामंडपाबाहेर सुमारे पाच मण वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे. चिमाजी अप्पांनी ही घंटा भेट दिल्याचे सांगण्यात येते. या घंटेवर १७२९ असे इंग्रजीत नोंद आहे. हेमाडपंती पद्धतीचे बांधकाम असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार व नवे बांधकाम केल्यामुळे मूळ मंदिर बघण्यास मिळत नाही.
मंदिराचा भव्य सभामंडप, उंच कळस, डोंगर उतरल्याशिवाय दिसत नाही. शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज येथे भीमाशंकराच्या दर्शनास येत असत, पेशवे बाळाजी विश्वनाथ हे देखील येथे दर्शनासाठी आल्याच्या नोंदी आहेत. नाना फडणवीसांनी शिखरासह या मंदिराचा जिर्णोध्दार केला होता. सभामंडपाशेजारी दर्शनासाठी लोखंडी रांगा तयार केलेल्या आहेत. आधुनिक कॅमेरे लावून परिसरावर लक्ष ठेवण्यात येते. तसेच मोठा टिव्हीवर थेट गाभाºयातील शिवशंकराचे दर्शन घडते. गर्दी नसल्याने मनसोक्त शंकराचे दर्शन घडले.
रायगड जिल्ह्यातील खांडस गावातून पायी चालत पुढे गणपतीघाट किंवा शिडीघाट रस्त्याने भीमाशंकरला येता येते, पण हा रस्ता फक्त अनुभवी व ट्रेकिंग करणाºयांसाठी आहे. येथून जवळच असलेला भंडारधरा, हरिश्चंद्रगड, शिवनेरी, चावंड, हडसर, आदी किल्यांमुळे तसेच अष्टविनायकातील ओझर, लेण्याद्री या तीर्थस्थानांमुळे पर्यटकांची गर्दी नेहमीच दिसून येते. मी १७ वर्षांपूर्वी ढाकचा बहिरी ते भीमाशंकर(bhimashankar) असा पावसाळा संपल्यानंतर पायी ट्रेक केला होता. जाम मजा आली होती. त्यानंतर आज पुन्हा हे मंदिर पाहण्याचा योग आला. त्यावेळचे डोळ्यासमोरील मंदिर व आजचे मंदिर यात खूपच फरक पडलेला दिसून आला.
(bhimashankar)भीमाशंकर शिखराची समुद्रसपाटीपासूनची उंची ३४५४ फूट म्हणजे सुमारे पाऊण मैल आहे. सह्याद्रीच्या या भागात उन्हाळ्यात कडक उन्हाळा, पावसाळ्यात नको होईल एवढा धो-धो पाऊस व हिवाळ्यात हाडे गोठविणारी थंड बोचरी हवा या ठिकाणी असते. भीमाशंकरला पाऊस खूप पडतो. पावसाळ्यात डोळ्यांना तृप्त करणारा असा येथील निसर्ग असतो. आल्दादायक स्वच्छ वातावरणामुळे एकदा तरी आवश्यक भेट देण्याचे हे ठिकाण आहे हे निश्चित.
(bhimashankar)भीमाशंकरचे अभयारण्य अनेक जातींचे पक्षी तसेच अनेक प्रकारच्या वन्यजीवांचे घर आहे. वनसंपदा संरक्षित करण्यासाठी १९८५ पासून हा संपूर्ण परिसर अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला आहे. निर्सगाने या ठिकाणी मुक्त हस्ताने उधळण केलेली दिसून येते. नानाप्रकारचे पशुपक्षी, वेली, झाडे, औषधी वनस्पती खूप प्रमाणात दिसतात. रिठा, शिसम, आंबा, उंबर, हिरडा, बेहडा, रानजाई, रानतुळस, आपटा, आवळा, अडसुळा, डोंगरची काळी मैना असलेली करवंदे, जांभूळ या ठिकाणी आढळून येतात. मंदिराच्या परिसरात अनेक ठिकाणी ही औषधी वनस्पती घेऊन विक्री करणारे दुकानदार पहावयास मिळतात.
बहुधा हे लोक कातकरी, ठाकर, आदीवासी असतात. किरकोळ किंमतीला ते विविध रोगांवर ही औषधी वनस्पती विकतात. याच जोडीला पशुपक्षी देखील पहावयास मिळतात. (bhimashankar)भीमाशंकरचं प्रतीक म्हणून वैशिष्टयÞपूर्ण असलेला दुर्मिळ प्राणी म्हणजे ‘शेकरू’. महाराष्ट्राचे मानचिन्ह म्हणून शेकरू ला महत्व आहे. छोट्या खारीची ही मोठी बहीणच. त्याचबरोबर बिबळ्या, भेकर, सांबर, चितळ, रानडुक्कर, ससे, कोल्हे, काळविट, मुंगुस, भेकर, सर्प या प्राण्यांबरोबरच सुतारपक्षी, दयाळ, पोपट, कोतवाल, जंगली कबुतरे, कोकीळ, तांबट, घुबड, मोर, खाटीक, चंडोल, रानकोंबडया, धनेश हे पक्षीही येथे पाहायला मिळतात.
महाराष्ट्रातील एक मुख्य नदी व पवित्र नदी म्हणून ओळखल्या जाणाºया भीमेचा उगम याचा भीमाशंकरच्या डोंगरातील ‘डाकिणीचे वन’ या भागात होतो. उगमस्थानापासून कृष्णा नदीला मिळेतेस्तोवर नदीची लांबी सुमारे ८६७ किमी एवढी भरते. ‘भीमरथा’, ‘भीमरथी’ ही या नावानेही तिला ओळखले जाते. सोलापूर जिल्ह्यातून पंढरपूरला आल्यावर तिचे पात्र चंद्रकोरीच्या आकारासारखे दिसते. त्यामुळे तेथे ती ‘चंद्रभागा’ म्हणून ओळखली जाते. भामा, इंद्रायणी, वेळ, मुळा-मुठा, घोड, नीरा, माण, सीना आदी भीमेच्या उपनद्या आहेत. भीमेवर सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यात उजनी धरण बांधले आहे. नदी पुणे, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यांतून पुढे विजापूर, गुलबर्गा या कर्नाटक राज्यातून वाहत जाऊन कृष्णा नदीस मिळते.
तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या