audumbar – तीर्थक्षेत्र औदुंबर

audumbar information in marathi

सांगली जिल्ह्यातील तीर्थ क्षेत्रापैकी औदुंबर (audumbar) हे एक श्री दत्तात्रयांचे जागृत स्थान आहे. तासगाव तालुक्यात भिलवडी गावाजवळ कृष्णा नदीच्या पवित्र काठी रम्य वनश्रीमध्ये हे देवालय आहे. देवालयामध्ये श्री दत्तांच्या पादुका आहेत. या श्रीक्षेत्राच्या परिसर विकासाचे महत्वपूर्ण कार्य शासनाने हाती घेऊन घाट बांधला आहे.

औदुंबर (audumbar) पश्चिम महाराष्ट्रातील आध्यात्मिक, धार्मिक व सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाते.कृष्णा काठचा नयनरम्य परिसर श्रीं दत्त गुरूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. श्रीं दत्तावतार नरसिंह सरस्वतीचे हे स्थान आहे.तीर्थक्षेत्र औदुंबर स्थळी विमल पादुकारुपाने त्यांचा वास सुरू आहे.

श्री च्या पादुकावर अंकलखोपचे देशपांडे यांनी घुमट बांधला वर्ष भरात येथे अनेक धार्मिक विधी, समारंभ, उत्सव होतात.मार्गशीर्ष शुध्द १५ श्री दत्तजयंती, दत्तजन्मोत्सव व महाप्रसाद होतो.माघ शुध्द एकपासून श्रीं नृसिहसरस्वती निर्वाण मोहत्सव होतो.माघ वाद्य ५ या दिवशी गुरूपादुकाची महापूजा होते. त्या दिवशी गावातून पालखी मिरवणूक निघते.मकरसंक्रांतीस सदानंद साहित्य मंडळाचे संमेलन होते.


गुरू शिवशंकर आश्रम – ( audumbar)

औदुंबर (audumbar) मधील कृष्णेच्या घाटालगत श्रीगुरू शिवशंकरानंद आश्रमाची प्रशस्त वास्तू आहे.वेदाचे अध्ययन आश्रमाची प्रशस्त वास्तू आहे.वेदाचे अध्ययन या आश्रमात होते.पौरोहित्याचे शिक्षण दिले.जाते. आश्रमात मौलिक साहित्य आहे.संस्कृत ग्रंथ आहेत.


ब्रह्मानंद मठ – ( audumbar)

औदुंबर (audumbar) येथे महायोगी ब्रह्मानंद महारजांचा जुना मठ आहे.बहुतेक ठिकाणी दत्तमूर्ती विष्णू प्रधान स्वरूपात असते.येथे मात्र ती शिवप्रधान स्वरूपात प्रतिष्ठापित आहे. येथे शंकराची पिंड ही वैशिष्टयपूर्ण आहे. मठाच्या समोर दोन पिंपळाची झाडे होते.जय-विजय अशी त्यांची नावे होती.कालांतराने ती नष्ट झाली


कृष्णेचा डोह – (audumbar marathi)

ओदुंबर (audumbar) येथील कृष्णेचा डोह रमणीय आणि लोभस असा हा डोहकाळिमा आहे.अलीकडे श्री दत्तमंदिर व पैलतीरावर भूवनेश्वरी मध्ये कृष्णेचा डोह आहे.त्यावरून भावीकाना ने-आण करणारी नौका चालते.डोहातील पाणी कमी झाल्यावर सिध्दनाथाचे मंदिर दृष्टीस पडते.नृसिंह-सरस्वातीच्या निर्वाणदिनी फुलांनी सजविलेला पाळणा सोडला जातो.बाजूस सुंदर घाट बांधण्यात आला आहे.


भुवनेश्वरी मंदिर – (audumbar information in marathi)

औदुंबरच्या पैलतीरावरील श् भुवनेश्वरी मंदिर आद्य शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते. नृसिंह सरस्वती औदुंबर येथे आले.  त्याही आधी भुवनेश्वर येथे वसली आहे. रम्य परिसर,दगडी रेखीव हेमांडपंथी मंदिर आहे.

मंदिर परिसरात दगडी बुरूज,समोरील दगडी दिपमाळा,हनुमान,गणपती,काळ्भैरव,महादेवाची छोटी मंदिरे,प्रवेशद्वारे या मंदिराचा परिसर विलोभनिय जाणवतो.भिलवडी गावातून मंदिरापर्यत मार्ग आहे.तीर्थक्षेत्र औदुंबरातील अवधूत नौकेतून कृष्णेचा डोह पार केला की मंदिराची दगडी वाट सुरू होते. मंदिर परिसर प्रशस्त व शांत आहे.देवाची मूर्ती साडेचार फूटी चक्रधारी आहे.

मंदिर वास्तुशिल्पाचा वैशिष्टयपूर्ण नमुना आहे.रेखीव दगडांमुळे सौंदर्यात भर पडते.कोणत्याही हवामानात मंदिरातील वातावरण समाधान देणारे जाणवते.समोरील दगडी दीपमाळेवर कंरजाच्या तेलाचे दिवे लावले.मंदिर उजळून निघते.परिसरतील माहेरवाशिणी देवीची ओटी भरून जातात.ओदुंबरला येणारे भाविक हमखास या देवी च्या दर्शनासाठी येतात.


कृष्णाकाठचे तीर्थक्षेत्र औदुंबर – (audumbar datta temple)

नृसिंहसरस्वती आपल्या तीर्थाटनादरम्यान नृसिंहवाडीच्या आधी औदुंबर क्षेत्री राहिले होते. १४२१ सालच्या चातुर्मासात त्यांचा निवास कृष्णातीरावरील या मनोहारी वनात होता. याच ठिकाणी त्यांनी तीर्थक्षेत्र औदुंबर वृक्षाचा महिमा सांगितला. तीर्थक्षेत्र औदुंबर वृक्षात माझा नित्य वास राहील असं त्यांनी सांगितलं. तीर्थाटनादरम्यानचं चातुर्मास्य अनुष्ठान नृसिंहसरस्वतींनी याच ठिकाणी केलं आणि त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेलं हे

तीर्थक्षेत्र औदुंबराचं वन आज दत्त क्षेत्र तीर्थक्षेत्र औदुंबर म्हणून प्रसिद्ध आहे. गुरुचरित्राच्या १७ व्या अध्यायात येथील वास्तव्यादरम्यानच्या नृसिंहसरस्वतीच्या कार्याचं वर्णन केलं आहे.

कृष्णेच्या ऐलतीरावर भिलवडीजवळ भुवनेश्वरीचं प्राचीन शक्तिपीठ आहे. येथे तपस्वी जनांची वस्ती नेहमीच असे. वृक्षांच्या गर्दीमुळे अनुष्ठानासाठीचा पवित्र असा एकांत आपोआपच तयार झाला होता. त्याला जोड मिळाली पैलतीरावरील नृसिंहसरस्वतींच्या पुनीत वास्तव्याची.

त्यांनी तीर्थक्षेत्र औदुंबरच्या महिमा विशद करून या स्थानाचं महत्त्व अधोरेखित केलं आणि दत्तप्रभूंच्या क्षेत्रात तीर्थक्षेत्र औदुंबराचं महत्त्व वाढलं. १९०४ साली ब्रह्मानंदस्वामी हे गिरनार पर्वती असणारे सत्पुरुष येथे आले आणि त्यांनी हे क्षेत्र प्रकाशात आणलं. कृष्णातीरावरील विस्तीर्ण घाट आणि तीर्थक्षेत्र औदुंबराचं वन यामुळे हे क्षेत्र साधनेसाठी प्रसिद्ध होत गेलं.

भारतीय संस्कृतीकोशानुसार तीर्थक्षेत्र औदुंबरचा आणखीन एक संदर्भदेखील सापडतो. पंजाबातील बियास, सतलुज व रावी यांच्यामधील प्रदेशातील जनपद असणारे हे लोक होते. स्वत:ला ते विश्वामित्राचे वंशज म्हणवतात. तिथे सापडलेल्या नाण्यांवर विश्वामित्राचं चित्र आढळून आलं आहे. त्या तीर्थक्षेत्र औदुंबराचं राज्य प्रजासत्ताक असावं असा उल्लेख आहे.

नरसिंह-सरस्वतींचा जन्म कारंजा म्हणजे वऱ्हाडातला; परंतु कृष्णाकाठ हीच त्यांनी आपली कर्मभूमी बनविली. त्यांच्या वास्तव्याने, तपाने आणि लोकोद्धाराच्या कार्याने कृष्णाकाठी तीर्थक्षेत्र औदुंबर आणि नरसोबाची वाडी ही दोन पवित्र क्षेत्रे निर्माण झाली आहेत. कृष्णा नदीच्या ऐलतीरावर भिलवडी आहे व पैलतीरावर तीर्थक्षेत्र औदुंबर हे क्षेत्र आहे. सांगलीकडून बसने थेट तीर्थक्षेत्र औदुंबरात पोहोचता येते. तेथे रहाण्या-जेवण्याची व्यवस्था होऊ शकते. शिवाय गावात धर्मशाळाही आहेत.

श्री नरसिंहसरस्वती हे श्रीदत्तात्रेयांचे दुसरे अवतार समजले जातात. त्यांच्या तपाच्या तेजाने, शास्त्रपूत आचाराने आणि बुद्धीच्या प्रभावाने महाराष्ट्रात दत्तसंप्रदाय सर्वत्र प्रसार पावला. त्यांचे हे कार्य इतके मोठे आहे की, लोक त्यांनाच दत्तसंप्रदायाचे प्रवर्तक मानतात. त्यांनी सन १४४१मध्ये तीर्थक्षेत्र औदुंबर येथे चातुर्मासात वास्तव्य केले, त्यामुळे तीर्थक्षेत्र औदुंबर हे महाराष्ट्रात दत्तस्थान म्हणून विशेष प्रसिद्ध पावले.

कृष्णेच्या पैलतीरावर अंकलखोप नावाचा गाव आहे आणि ऐलतीरावर भिलवडीजवळ भुवनेश्वरी देवीचे देवालय आहे. भुवनेश्वरी हे शक्तिपीठ असल्यामुळे या परिसरात तपस्वी जनांचा वावर नेहमी असे. कृष्णेच्या तीरावर वृक्षांच्या दाटीमुळे आपोआपच एकांतमय तपोवन निर्माण झाले होते. या निसर्गसिद्ध तपोवनात, तीर्थक्षेत्र औदुंबराच्या दाट शीतल छायेत नरसिंह्सरस्वतींनी एक चातुर्मासाचा काळ घालविला आणि या स्थानाला चिरंतन पावित्र्य प्राप्त करुन दिले.

तुझ्या जळानें मनें आमुची तूं धवळित राही, कृतज्ञभावें तुला वंदिता श्रीकृष्णामाई !
अशी कृष्णामाईची मनोमन प्रार्थना करुन आणि शुचिर्भूत होऊन दत्तदर्शनाला जावयाचे. घाटावरून सरळ पादुकांपर्यत जाता येते. हा घाट येथील ब्रम्हानंदस्वामींचे शिष्य सहजानंदस्वामी यांनी दत्तभक्तांकडून आर्थिक सहाय्य गोळा करून विसाव्या शतकाच्या प्रारंभी बांधविला आहे.

दत्तचरणांचे दर्शन घेऊन आपण प्रदक्षिणा करू लागला की, बाजूच्या ओवऱ्यांतून दत्तभक्त गुरूचरित्राचे पारायण करीत असताना दिसतील. दत्त संप्रदायात कठोर तपाचरणाला फार मह्त्व आहे. अत्यंत काटेकारपणाने आचारधर्माचे पालन करणाऱ्याला दत्तसाक्षात्कार सुलभ होतो, अशी सांप्रदायिकांची श्रद्धा आहे. गोरक्षनाथ, चांगदेवराऊळ, जनार्दनस्वामी, एकनाथ, दासोपंत, निरंजन रघुनाथ इत्यादि थोर दत्तभक्तांची नावे आठवताच त्यांच्या निग्रही तपाचरणाचा इतिहास आपणाला नतमस्तक बनवितो.

या ठिकाणी स्वत: नरसिंहसरस्वती चार महिने एकांताचा आनंद लुटीत राहिले होते, त्या ठिकाणी त्यांच्या चरित्राचे आणि उपदेशाचे चिंतन करीत राहण्यात औचित्य आहे. त्यामुळे आपोआपच तपाला अनुकूल मानसिक बैठक लाभते.तीर्थक्षेत्र औदुंबर दत्तमंदिर परिसर श्रींची मूर्ती

मंदिराच्या परिसरांत तीर्थक्षेत्र औदुंबर वृक्षाची घनदाट छाया आहे. आकाशात सूर्य तळपत असताना जमिनीवर छाया – प्रकाशाची जाळीदार रांगोळी तरळत राहते. या तीर्थक्षेत्र औदुंबरांच्या छायेतून मंदिरप्रदक्षिणा करुन, वरच्या ’आजोबा’ वडाखालच्या वाटेने गेले की, ब्रम्हानंदस्वामींचा मठ लागतो. हे सत्पुरुष १८२६च्या सुमारास गिरनारहून तीर्थक्षेत्र औदुंबरक्षेत्री आले आणि इथेच एक मठी उभारून त्यांनी तपश्चर्या केली.

या शांत, प्रसन्न आणि पवित्र वातावरणात त्यांच्या तपाला सिद्धीचे यश प्राप्त झाले आणि अखेर इथेच त्यांनी समाधी घेतली. त्यांच्याबरोबर मेरूशास्त्री नावाचे एक विद्वान गृह्स्थ होते. त्यांनी ब्रम्हानंदांच्या सहाय्याने ‘हठयोगप्रदीपिका’ या योगशास्त्रावरील प्रसिद्ध संस्कृत ग्रंथावर ’ज्योत्स्ना’ नावाची टीका लिहिली.

ब्रम्हानंदांचे शिष्य सहजानंदस्वामी यांनी भक्त-भाविकांकडून वर्गणी गोळा करुन तीर्थक्षेत्र औदुंबरचा प्रशस्त घाट बांधण्याचे सत्कार्य केले. या ब्रम्हानंद मठातच श्रीवासुदेवानंदसरस्वती (दत्तसंप्रदायातील एक अर्वाचीन सत्पुरूष) यांनी आपल्या जीवनसाधनेची पहिली पावले टाकली होती. पु़ढे या मठात श्रीनारायणानंदतीर्थ या नावाचे एक सत्पुरुष राहात असत.

औंदुबरक्षेत्री चैत्रात कृष्णमाई उत्सव, श्रीपाद श्रीवल्लभ उत्सव, श्री नरसिंह सरस्वती जन्मोत्सव, दत्तजयंती असे उत्सव साजरे केले जातात. ह्या अत्यंत रमणीय दत्तक्षेत्राला अवश्य भेट द्यावी. नारायणानंद सरस्वती स्वामी महाराज तीर्थक्षेत्र औदुंबर

कृष्णातिरीच्या वसणाऱ्या । ये तीर्थक्षेत्र औदुंबरीं बसणाऱ्या ।। धृ ।।
काष।यांबर घेणाऱ्या । पायी पादुका घालणाऱ्या  ।। १ ।।                             
भस्मोद्धलन करणाऱ्या । दंड कमंडलू घेणाऱ्या ।। २ ।।                         
स्वभक्त संगे असणाऱ्या । भक्त।भिप्सीत करणाऱ्या ।। ३ ।।                       
स्मरता दर्शन देणाऱ्या । वासुदेवाच्या कैवाऱ्या ।। ४ ।।


या क्षेत्री असे जावे – (Shreekshetra Audumbar)

सांगली जिल्ह्यातकृष्णा नदी काठी वसलेले तीर्थक्षेत्र औदुंबर हे दत्त क्षेत्र भारतातील अनेक दत्त स्थानापैकी प्रमुख दत्तक्षेत्रआहे. श्री दत्त संप्रदायात या क्षेत्राचे विशेष महत्त्व आहे. या ठिकाणी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे वास्तव्य अल्प म्हणजे एक चातुर्मास पुरते होते. कोल्हापूरच्या मूढ पुत्राला येथे स्वामींच्या आशिर्वादाने ज्ञान प्राप्ती झाली.

ही कथा गुरुचरित्राच्या १७ व्या अध्यायात आलेली आहे. याच ठिकाणी संत जनार्दन स्वामी, श्री संत एकनाथ महाराज यांना दत्त दर्शन झाले. याच ठिकाणी स्वामींनी तीर्थक्षेत्र औदुंबर (audumbar) वृक्षाचा महिमा सांगितला, व माझा नित्य त्या वृक्षामध्ये निवास राहील, व त्यावृक्षाची नियमीत पूजा किंवा त्या वृक्षाखालीगुरुचरित्र पारायण करणारया भक्तास त्याने केलेल्या पुजेचे अगर पारायणाचे फळ हजार पटीने मिळेल, त्याभक्ताला माझा आशिर्वाद राहील; असे वचन दिले.

औदुंबर (audumbar) या ठिकाणी जाण्यासाठी सांगली बस स्थानकावरून नियमीत बस सेवा आहे. सांगली-अंकलखोप या बसने इथे जाता येते. तासगाव-कोल्हापूर या बसमार्गावर हे क्षेत्र आहे. रेल्वेमार्गांनी प्रवास करणारया भक्तांसाठी पुणे, कोल्हापूर मार्गावर भिलवडी स्टेशन लागते. त्या स्टेशनवरून उतरून बस मार्गाने (७ किमी) अंतरावर असलेल्या तीर्थक्षेत्र औदुंबर या क्षेत्रास जाता येते. या ठिकाणी राहण्यासाठी जोशी अगर पुजारी यांचेघरी सोय होऊ शकते                                                           


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

source dattmaharaj.com & vikaspedia