श्री तीर्थक्षेत्र आळंदी(alandi) महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर यांचे आळंदी हे समाधिस्थान आहे. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केला. या आळंदी गावाला “देवाची आळंदी” असे म्हणतात, कारण चोराची आळंदी नावाचे आणखे एक गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे. ही देवाची आळंदी पुण्यापासून पंचवीस किलोमीटरवर आहे.
वारकरी लोकांसाठी तसेच समस्त मराठी जनांसाठी आळंदीला मोठे महत्त्व आहे. आळंदी हे शहर इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले आहे. संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराच्या मागच्या बाजूला नदीवर असलेला घाट अतिशय सुंदर आहे. ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी येथे १२१८ साली समाधी घेतली. त्या जागी एक सुंदर समाधिमंदिर बांधण्यात आले. आषाढ महिन्यातील एकादशीला आळंदीहून निघून पंढरपूरला ज्ञानेश्वरांची पालखी जाते. या पालखीसोबत लाखो वारकरी अंदाजे २१६ किमी अंतर पायी चालत पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी जातात.
चांगदेव नावाचे एक ज्येष्ठ योगी ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला वाघावर बसून आले होते. त्यावेळी ज्ञानेश्वर आपल्या भावंडांसमवेत एका भिंतीवर बसून ऊस खात होते. चांगदेवाची भेट घेण्यासाठी ज्ञानेश्वरांनी त्या भिंतीलाच चालवत नेले अशी आख्यायिका आहे. ती भिंत आळंदीला आहे.
आळंदी (alandi devachi) मधील धर्मशाळेच वेगळे वैशिष्ट्यपूर्ण कार्य म्हणजे वारकरी सांप्रदायिक धार्मिक शिक्षणासाठी आलेल्या शिकाऊ विद्दार्थी वर्गाला शिक्षणसाठी विनामुल्य सोय करणे.
देविदास धर्मशाळा गोपाळपूर
फ्रुटवाले धर्मशाळा प्रदक्षिणा रोड
घासवाले धर्मशाळा प्रदक्षिणा रोड
मुक्ताबाई धर्मशाळा प्रदक्षिणा रोड
माहेश्वरी धर्मशाळा प्रदक्षिणा रोड
आगरी धर्मशाळा भिंतीजवळ वडगांव रोड
डबेवाले धर्मशाळा भिंतीजवळ वडगांव रोड
हरिहर महाराज धर्मशाळा भिंतीजवळ वडगांव रोड
विठ्ठल बाबा देशमुख धर्मशाळा वडगांव रोड
पाषाणकर धर्मशाळा
माई धर्मशाळा प्रदक्षिणा रोड
असे है आळंदीतील धर्म शाळा आहे
आळंदीत खालील प्रमाणे आपल्याला काही प्रेक्षणीय स्थळे पहायला मिळतात
इंद्रायणी नदी
कृष्ण मंदिर
मुक्ताई मंदिर
राम मंदिर
विठ्ठल रखुमाई मंदिर
स्वामी हरिहरेंद्र मठ
छत्रपती संभाजी महाराज समाधी, तुळापूर
जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था
है आळंदीतील प्रेक्षणीय स्थळे आहेत
आळंदी दर्शनाविषयी विडिओ स्वरूपात माहिती वाचण्यासाठी खालील विडिओ पहा
तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: wikipedia