उदारा पंढरिराया नको अंत पाहूं – संत सोयराबाई अभंग
उदारा पंढरिराया नको अंत पाहूं ।
कोठवरि मी पाहूं वाट तुझी ॥१॥
माय तूं माउली जिवींचा जिव्हाळा ।
पुरवावा लळा मायबाप ॥२॥
सर्वांपरी उणें दिसते कठिण ।
आता नका शीण माणी माझा ॥३॥
निवांतचि ठेवा तुमचिये दारी ।
म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.