संत सोयराबाई अभंग

नामाचें चिंतन करा सर्वकाळ – संत सोयराबाई अभंग

नामाचें चिंतन रा सर्वकाळ – संत सोयराबाई अभंग


नामाचें चिंतन करा सर्वकाळ ।
नाही काळवेळ नामालागी ॥१॥
सुलभ हें सोपें नाम आठवितां ।
हरि हरि म्हणतां मोक्षमुक्ती ॥२॥
सायासाचें नाही येथे हें साधन ।
नामाचे चिंतन करा सुखे ॥३॥
नामाचे सामर्थ्य जपतां ।
श्रीहरी म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नामाचें चिंतन करा सर्वकाळ – संत सोयराबाई अभंग

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *