नामाचा भरंवसा मानिलासे सार – संत सोयराबाई अभंग

नामाचा भरंवसा मानिलासे सार – संत सोयराबाई अभंग

नामाचा भरंवसा मानिलासे सार ।
उतरले पार भवनदी ॥१॥
नाम हें सोपें नाम हें सोपें ।
नाम हें सोपे मुखी गाता ॥२॥
नामाची आवडी सदा सर्वकाळ ।
नाहीं काळ वेळ नाम गातां ॥३॥
नामेंचि जन तरती संसारी ।
म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नामाचा भरंवसा मानिलासे सार – संत सोयराबाई अभंग