किती हे मरती किती हे रडती – संत सोयराबाई अभंग
किती हे मरती किती हे रडती ।
कितिक हांसती आपाआपणा ॥१॥
पाहांता विचार काय हें खरे ।
खोटयालागी झुरे प्राणी देखा ॥२॥
मरती ते काय रडाती ते काय ।
हासती ते काय कवण कवणा ॥३॥
कवण तो मेला कवण राहिला ।
हासती रडाती कवणाला न कळे कांही ॥४॥
सोयरा म्हणे याचें नवल वाटतें ।
परी नाठवितें देवा कोणी ॥५॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
संत सोयराबाई यांचा अभंग ” किती हे सुख मानिती संसाराचे | काय हे साचे मृगजळचे || ” या अभंगाचा अर्थ कळेल का? कृपया कुणाला माहीत असेल तर कळवा!