दोघी बैसल्या सुखासनीं – संत सोयराबाई अभंग
दोघी बैसल्या सुखासनीं ।
सोयरा न्याहाळीतसे नयनी ॥१॥
कृपाळुवा माझा बाप ।
विठ्ठल निर्मळ एकरुप ॥२॥
अवघ्या सांगता वृत्तांत ।
रडे चोखियाची कांता ॥३॥
विठ्ठल रूपाचिये थोरी ।
म्हणे चोख्याची महारी ॥४॥
वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.