संत सोयराबाई अभंग

देहासी विटाळ म्हणती सकळ – संत सोयराबाई अभंग

देहासी विटाळ म्हणती सळ – संत सोयराबाई अभंग


देहासी विटाळ म्हणती सकळ ।
आत्मा तो निर्मळ शुध्द्बुध्द ॥१॥
देहिंचा विटाळ देहीच जन्मला ।
सोवळा तो झाला कवण धर्म ॥२॥
विटाळावाअंचोनी उत्पत्तीचे स्थान ।
कोण देह निर्माण नाही जगीं ॥३॥
म्हणुनी पांडुरंगा वानितसे थोरी ।
विटाळ देहांतरी वसतसे ॥४॥
देहाचा विटाळ देहींच निर्धारी ।
म्हणतसे महारी चोखियाची ॥५॥


वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.

देहासी विटाळ म्हणती सकळ – संत सोयराबाई अभंग

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *