चोखा बैसतां समाधीसी – संत सोयराबाई अभंग
चोखा बैसतां समाधीसी ।
निर्मळा आली पंढरीसी ॥१॥
पाहोनी आनंदसोहळा ।
म्हणे विठ्ठला दयाळा ॥२॥
चोखा मेळविला रूपी ।
माझी आतां कोण गती ॥३॥
देव बैसोनी निकटी ।
निर्मळेसी सांगे गोष्टी ॥४॥
ऐसें देखोनियां नयनी ।
सोयरा मिठी घाली चरणीं ॥।५॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.