बैसोनी एकांती बोले गुजगोष्टी – संत सोयराबाई अभंग
बैसोनी एकांती बोले गुजगोष्टी ।
घालोनियां मिठी चरणासी ॥१॥
बहु दीस झाली वाटतसे खंती ।
केधवां भेटती बाई मज ॥२॥
तुम्हांसी तों चाड नाहीं आणिकाची ।
परी वासना आमुची अनिवार ॥३॥
सोयरा म्हणे चला जाऊं तेथवरी ।
गुजगोष्टी चारी बोलुं कांही ॥४॥
वरील अभांगाचा अर्थ तुमच्या शब्दामध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये टाका.