ऐशा आनंदात एक मासवरी – संत सोयराबाई अभंग

ऐशा आनंदात ए मासवरी – संत सोयराबाई अभंग


ऐशा आनंदात एक मासवरी ।
राहिली निर्धारी पंढरीये ॥१॥
नित्य जावोनियां चंद्रभागेस्नान ।
घाली लोटांगण पुंडलिका ॥२॥
क्षेत्र प्रदक्षिणा नामाच्या गजरी ।
येवोनी महाद्वारी हरि वंदी ॥३॥
सोयरा म्हणे ऐस सारोनियां नेम ।
वाचें गाय नाम विठोबाचें ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ऐशा आनंदात एक मासवरी – संत सोयराबाई अभंग