आजि माझा सर्व पुरवा नवस – संत सोयराबाई अभंग

आजि माझा सर्व पुरवा नवस – संत सोयराबाई अभंग

आजि माझा सर्व पुरवा नवस ।
देखिले पायांस विठोबाच्या ॥१॥
अनंता जन्मांचे फिटलें सांडे ।
कोंदाटलें पुढें रूप त्यांचे ॥२॥
आठवीत होतें गोमटी पाउलें ।
तोंचि देखियेलीं विटेवरी ॥३॥
आनंद नसमाय मनाचे अंतरी ।
म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आजि माझा सर्व पुरवा नवस – संत सोयराबाई अभंग