शरीर निर्मळ वासना टवाळ – संत सोपानदेव अभंग

शरीर निर्मळ वासना टवाळ – संत सोपानदेव अभंग


शरीर निर्मळ वासना टवाळ ।
का रे तु वरळ भक्तिविण ।।१।।
सर्व ब्रह्म हरि नेणसि सोवळे ।
एकाचि गोपाळे जन वन ॥२॥
आप पृथ्वी तेज वायो व्योम ।
पंचभूती सम वर्ततसे ॥३॥
सोपान म्हणे गुरूचा उपदेश शुद्ध ।
तरीच वासना प्रबुद्ध तया नरा ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संत सोपानदेव अँप डाउनलोड करा.