नाही नाही भान न दिसे प्रपंच – संत सोपानदेव अभंग

नाही नाही भान न दिसे प्रपंच – संत सोपानदेव अभंग


नाही नाही भान न दिसे प्रपंच ।
रोहिणी आहाव मृगजळ ।। १।।
तुटलासे साटा वासना चोखाळ ।
दिननिशी फळ राम झाला ॥२॥
रामेविण दुजे नाही पै हो बिजे ।
बोलतु सहजे वेदु जाणा ॥३॥
निरवृत्ति खुणा विज्ञान देवा हरि ।
सोपान झडकरी झोबियेला ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संत सोपानदेव अँप डाउनलोड करा.