गुळावरी जैशी – संत सोपानदेव अभंग
गुळावरी जैशी । बैसलिशे माशी ।
उठवितां तयेसि । न उठेचि ॥१॥
तैसी गुरूभक्ती । असावी वासना ।
ग्रासुनि कामना । राहो नीट ॥२॥
आम्ही नेणों काही । गुरवीण तत्वता ।
म्हणतसे सर्वथा । सोपानदेव ॥३॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
संत सोपानदेव अँप डाउनलोड करा.