ज्ञानदेवी आन नाही ते भिन्न – संत सोपानदेव अभंग

ज्ञानदेवी आन नाही ते भिन्न – संत सोपानदेव अभंग


ज्ञानदेवी आन नाही ते भिन्न ।
प्रपंचाचे भरण तेथे नाही ॥१॥
स्वरूपाची खूण होऊनी सफळ ।
भोगी सर्वकाळ चित्सत्ता ॥२॥
आत्मापरमात्मा भेदाभेद द्वंद्ध ।
एकतत्त्व अभेद जनी वनी ॥३॥
सोपान दीप दिपी ते जीवन ।
तयामाजी जीवन एक झाले ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संत सोपानदेव अँप डाउनलोड करा.