विकासिला नयन स्फुरण आलें बाहीं ।
दाटले ह्रदयीं करुणाभरितें ॥ १ ॥
जातां मार्गी भक्त सावता तो माळी ।
आला तया जवळी पांडुरंग ॥ २ ॥
नामा ज्ञानदेव राहिले बाहेरी ।
मळिया भीतरीं गेला देव ॥ ३ ॥
माथा ठेऊनि हात केला सावधान ।
दिलें आलिंगन चहूं भुजीं ॥ ४ ॥
चरणीं ठेऊनि माथा विनवितो सावता ।
बैसा पंढरीनाथा करीन पूजा ॥ ५ ॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
संत सावतामाळी अँप डाउनलोड करा.