ऐकावे विठ्ठल धुरे - संत सावतामाळी अभंग

उठोनी प्रातःकाळीं करूनियां स्नान – संत सावतामाळी अभंग

उठोनी प्रातःकाळीं रूनियां स्नान – संत सावतामाळी अभंग


उठोनी प्रातःकाळीं करूनियां स्नान ।
घालुनि आसन यथाविधी ॥ १ ॥
नवज्वरें देह जाहालासे संतप्त ।
परि मनीं आर्त विठोबाचें ॥ २ ॥
प्राणायाम करूनी कुंभक साधिला ।
वायु निरोधिला मूळ तत्त्वीं ॥ ३ ॥
शके बाराशें सत्रा शालिवाहन शक ।
मन्मथ नामक संवत्सर ॥ ४ ॥
ऋतु ग्रीष्म कृष्ण आषाढ चतुर्दशी ।
आला उदयासी सहस्त्र कर ॥ ५ ॥
सावता पांडुरंगीं स्वरूपीं मीनला ।
देह समर्पिला ज्याचा त्यासी ॥ ६ ॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.


संत सावतामाळी अँप डाउनलोड करा.

play store

उठोनी प्रातःकाळीं करूनियां स्नान – संत सावतामाळी अभंग

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *