शिव ब्रम्हां विष्णू तिन्ही देव – संत सावतामाळी अभंग
शिव ब्रम्हां विष्णू तिन्ही देव एक ।
जे निराकार सम्यक विठ्ठल माझा ॥१॥
विठ्ठल नामाचा महिमा अगाध ।
होणे पुर्ण बोध ऐशा परी ॥२॥
अद्वैत वासना संतांचि संगती।
रायांची उपाधी बोलू नये ॥३॥
हरि मुकुंद मुरारी…. ।
हा मंत्र उच्चारि, सावता म्हणे ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
संत सावतामाळी अँप डाउनलोड करा.