माझी हीन याति- संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग – 9

माझी हीन याति- संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग – 9

माझी हीन याति । तुम्ही उदार श्रीपती ।।
नका देऊ भुक्ति मुक्ति । माझी परिसावी विनंती ॥
सावता म्हणे पांडुरंगा । दुजेपण न्यावे भंगा ।।

 

मथितार्थ : या अभंगात सावता महाराज लोकशाहीतील ‘समता’ या सूत्राचा संदेश आपल्याला देतात. म्हणजेच खरी लोकशाही वारकरी पंथात दिसून येते. देवाची भक्ती करताना जातीचा अडसर कुठेच येत नाही. देवाला सर्व भक्त समान आहेत, देव भक्ताची जात वर्ण पाहत नाही तर त्याची भक्ती पाहतो. भक्तिपंथात भाव आहे, एवढेच त्यांना माहित आहे. ते विठ्ठलाला म्हणतात, हे विठ्ठला मी माळी जातीत जन्मलो म्हणजे माझी जात सामान्य आहे पण देवा तुम्ही मनाने मोठे आहात उदार आहात, त्यामुळे माझा कमीपणा तुम्ही मानणार नाही.यावरून असे लक्षात येते कि, सावतोबांच्या वेळी जाती व्यवस्था अस्तित्वात असावी, त्यासाठी ते भागवत धर्माला आध्यात्मिक लोकशाहीचा संदेश देतात. पुढे जाऊन महाराज म्हणतात, मला सांसारिक जीवनातील ऐहिक भोग नको आहे, तसाच मोक्ष ही नको आहे, हे पांडुरंगा तुमच्या व माझ्यातील दुरावा दूर व्हावा हीच माझी इच्छा विनंती आहे. पांडुरंगाने आपल्याला आपले करावे असे महाराजांना वाटते, विठ्ठल भेटीची प्राप्तीची ओढ नेहमी जागी असलेली दिसून येते, भागवत धर्मामध्ये सर्व जाती धर्माचे संत असलेले दिसून येतात. यावरून समतेचा संदेश आपल्याला मिळतो.

श्री.दत्तात्रय संभाजी ढगे (सर).
श्री क्षेत्र अरण


वाचा :संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग

 

संत  सावतामाळी अँप डाउनलोड रा.