समयासी सादर व्हावे – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग – 8
समयासी सादर व्हावे । देवे ठेविले तैसे राहावे ।।
कोणे दिवशी बसून हत्तीवर । कोणे दिवशी पालखी सुभेदार ॥
कोणे दिवशी पायाचा चाकर चालून जावे । कोणे दिवशी बसून याची मन ।।
कोणे दिवशी घरात नाही धान्य । कोणे दिवशी द्रव्याची साठवण कोठे साठवावे ॥
कोणे दिवशी यम येती चालून । कोणे दिवशी प्राण जाती घेऊन ॥
कोणे दिवशी स्मशानी जाऊन एकटे राहावे । कोणे दिवशी होईल सद्गुरूची कृपा ।।
कोणे दिवशी चुकती जन्माच्या खेपा । कोण्या दिवशी सावत्याच्या बापा दर्शन द्यावे ॥
मथितार्थ : या अभंगात सावता महाराज काळाचा महिमा सांगतात. जीवनात सुख दुःखाचा खेळ सतत चालू असतो, येणाऱ्या प्रसंगाला तोंड देता आले पाहिजे. हा व्यवहारातील दाखला संसारी संत पुरुषच देऊ शकतात. परमेश्वराची भक्ती करता करता महाराज संसारातील जीवनाचे भेदक वर्णन करतात. माणसाने वेळ पडेल तसेच वर्तन करावे. कारण जीवन हे सुख-दुःखाने भरलेले आहे जीवनात जशी परिस्थिती येईल त्या परिस्थितीला तोंड दिले पाहिजे. कधी त्याला हत्तीवर बसायला मिळेल, तर कधी पायी चालावे लागेल असे करता एकदा सदगुरूची कृपा होऊन जन्म-मरणाचा फेराही चुकेल असे अभंगातून व्यक्त केले आहे.
श्री.दत्तात्रय संभाजी ढगे (सर).
श्री क्षेत्र अरण
वाचा :संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत सावतामाळी अँप डाउनलोड करा.