नको तुझे ज्ञान नको तुझा मान – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग – 6

नको तुझे ज्ञान नको तुझा मान – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग – 6

नको तुझे ज्ञान नको तुझा मान । माझे आहे मन वेगळेचि ॥
नको तुझी भुक्ती नको तुझी मुक्ती । मज आहे विश्रांती वेगळीच ॥
चरणी ठेउनी माथा विनवितसे सावता । ऐका पंढरीनाथा विज्ञापना ।।

 

मथितार्थ : या अभंगात सावता महाराज खोटा मान, सन्मान याचा धिक्कार करतात. संसारात राहून निष्काम, काम करण्यात समाधान मानतात यावरून निरपेक्ष भक्ती दिसते. भागवत धर्मामध्ये भक्तीला महत्त्वाचे स्थान आहे, देवाचे ज्ञान होणे म्हणजे देवाचे मूळ स्वरूप लक्षात आले पाहिजे. भाविक भक्त होण सावतोबांना नको आहे. त्यापेक्षाही त्यांच्या मनाची ओढ वेगळीच आहे. भक्ती करतानाही, भोग, उपभोग आपल्याला मिळावा याचीही ते अपेक्षा करत नाहीत. विठ्ठलाला ते विनंती करतात, हे पंढरीनाथा तुमच्या चरणावर मस्तक ठेऊन सांगतो की, माझे विश्रांतीचे स्थान वेगळे आहे यावर त्यांची भक्तीवरची निष्ठा दिसून येते भक्तीची शिकवण ते आपल्याला अभंगातून देतात.

श्री.दत्तात्रय संभाजी ढगे (सर).
श्री क्षेत्र अरण


वाचा :संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

संत  सावतामाळी अँप डाउनलोड रा.