नामाचिया बळे न भिऊ सर्वथा – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग -5

नामाचिया बळे न भिऊ सर्वथा – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग -5

नामाचिया बळे न भिऊ सर्वथा । कळीकाळाचे माथा सोटे मारू ।।
वैकुंठाचा देव आणूया कीर्तनी ॥ विठ्ठल गाउनी नाचू रंगी ।।
सुखाचा सोहळा करूनि दिवाळी । प्रेमे वनमाळी चित्ती धरू ॥।
सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा । तेणे मुक्ती द्वारा वोळंगती ॥

 

मतितार्थ : या अभंगात सावता महाराज सांगतात की नामसंकीर्तन करणारा भक्ती व मुक्ती यांची पर्वा करत नाही. कारण, नामाच्या जोरावर तो काळाच्या म्हणजे प्रत्यक्ष यमाच्या माथ्यावर सोटा (प्रहार ) मारतो, यमाला तो हरवू शकतो. वैकुंठात असणारा देवही जेथे नामस्मरण व कीर्तन असते तेथे हजर असतो. तेथे देव दिवाळी साजरी करत असतो, असा आत्मविश्वास सावता महाराजांना वाटतो, नव्हे तर त्यांचा हा स्वानुभव असावा असे वाटते. नामाच्या जोरात ज्या चार मुक्ती आहेत, त्या आपल्याला प्राप्त होतात. त्यासाठी भक्ती मार्गाचा अवलंब केला पाहिजे. अशाप्रकारचा उपदेश त्यांनी अभंगातून व्यक्त केला आहे.

श्री.दत्तात्रय संभाजी ढगे (सर).
श्री क्षेत्र अरण


वाचा :संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग

 

 

संत  सावतामाळी अँप डाउनलोड रा.