ऐकावे हे विठ्ठल धुरे । विनंती माझी हो सत्वरे ।।
करी संसाराची बोहरी ।इतुके मागतो श्रीहरी ।।
कष्ट करिता जन्म गेला । तुझा विसर पडला ।।
माळी सावता मागतो संतान । देवा करीगा नि:संतान ।।
मथितार्थ : या अभंगात सावता महाराज विठ्ठल भेटीसाठी उतावीळ झालेले असून, ते आपले मागणे मागतात. ते देवाला संसारातून मोकळीक मिळावी संसारात गुंतून पडू नये म्हणजे संसार करूच नये असे नाही, तर तुकारामांनी सांगितल्याप्रमाणे नको नको मना गुंतू मायाजळी अशाच उपदेश करतात, संसारिक माणसे देवाजवळ मुलाबाळांची मागणी करतात, कुटुंबवत्सलता माणसाजवळ असते, सावता महाराज ही असेच कुटुंबवत्सल आहेत, पण संसार कुटुंब सांभाळता सांभाळता मला विठ्ठल ही आठवला पाहिजे, संसार हाच माझा देव झाला पाहिजे, मुले तर हवीच पण त्यांचा पाश मात्र नको त्यात गुंतून न राहता त्यातील मिथ्या भाव लक्षात यावा व परमेश्वराच्या भक्तीत मन लागावे. ही विनंती महाराज या अभंगातून व्यक्त करतात.
श्री.दत्तात्रय संभाजी ढगे (सर).
श्री क्षेत्र अरण
वाचा :संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग
संत सावतामाळी अँप डाउनलोड करा.