दुजेपणाचा(दुसरेपणाचा ) भाव – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग – 35

दुजेपणाचा(दुसरेपणाचा ) भाव – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग – 35

दुजेपणाचा(दुसरेपणाचा ) भाव । नको काही आन ठाव ॥१॥
सदा वाचे नामावळी। गर्जो नित्य वेळोवेळी ॥२॥
सावता म्हणे दयाघना । आठव मना असू दयावा ॥३॥

या अभंगात सावता महाराज म्हणतात , हे देवा तुमच्या माझ्यात दुजेपणाचा(दुसरेपणाचा) म्हणजेच व्दैतभक्ती नको.अध्यात्मत व्दैत आणि अव्दैत असे दोन भक्ती प्रकार आहेत .दोन्हीही ईश्वराच्या व भक्ताच्या प्रेम अमृतात चिंब भिजवतात.व्दैत म्हणजे दोन आत्मे ,अव्दैत म्हणजे एकाकार,एक भक्त एक देव.काही संतानासमोर पांडुरंग बघण्यात त्याची सेवा करण्यात परमसुख प्राप्त व्हायचे ,पंढरपूरला गेल्यावर आम्हास देव दिसावा ,भेटावा हे भक्ताचे व्दैती लक्षण .आणि काही संत आपल्या भक्तीच्या बळावर ईश्वराला आपल्या स्वरूपात विलीन करून घेतात .या भक्तीच्या सावता महाराजांनी पांडुरंगाला आपल्या पोटात जागा दिली .

आपल्या पोटात प्रत्यक्ष पाडुंरंगाला साठवले.देव आणि भक्त एक झाले एकरुप झाले .जीव आणि शिव यांचे ऐक्य यामध्ये दिसून येते ,यासाठी सावता महाराज पांडुरंगाला म्हणतात हे देवा माझ्या मुखाने तुमचे सतत नामस्मरण घ्यावे .माझ्या वाणीला अष्टोप्रहर तुमच्याच नामाचा ध्यास असावा .तुमच्या नामाचा विसर पडता कामा नये.देवा तुम्ही मला तुमच्यापासून वेगळे करू नका.देवा तुम्ही मला वेगळे करू नका.याचे उदाहरण सांगायचे म्हटले तर “व्दैतभावास घातले पाणी lजैसे दुधात मिळे धारवणी l न दिसे परतून सर्वथा ll अशाप्रकारची अव्दैत भक्ती सावता महाराजांनी या अभंगात सांगितली आहे .

श्री दत्ताञय संभाजी ढगे
श्रीक्षेञ अरण


वाचा :संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग

 

संत  सावतामाळी अँप डाउनलोड रा.