मंगल मंगल नाम विठोबाचे – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग – 3

मंगल मंगल नाम विठोबाचे – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग – 3

मंगल मंगल नाम विठोबाचे । उच्चारिता वाचे जन्म खंडे ।।
सुलभ , दुर्लभ ब्रम्हादिका वंद्य । वेदादिक शुद्ध गाती जया ।।
सावता म्हणे सर्व सुखाचे आगर । रुक्मादेवी -वर विटेवरी ।।

 

मथितार्थ : या अभंगात सावता महाराज नामाचा महिमा सांगतात विठ्ठलाचे नाव अतिशय पवित्र आहे. विठ्ठल नामाचा महिमा अगाध आहे. विठ्ठलाचे नामस्मरण केल्यावर मुक्ती मिळते, म्हणजे जन्म-मरणाच्या फेऱ्यातून सुटका होते. सृष्टी निर्माता ब्रह्मदेव व इतर देवांनासुद्धा नाम (विठ्ठलाचे) पवित्र वाटते. वेदश्रुती हे ग्रंथसुद्धा विठ्ठलाचेच गुण गातात. शेवटी सावता महाराज म्हणतात सर्व सुखाचे भांडार सर्व सुखांचा संग्रहसाठा म्हणजे विटेवर उभा असणारा रुक्मिणी मातेचा पती विठ्ठल आहे, हाच विठ्ठल भोळ्या भाबड्या भक्तीचा रक्षणकर्ता आहे. म्हणून भक्त त्याचेच नाम घेतात अशाप्रकारचा उपदेश त्यांनी या अभंगातून व्यक्त केला आहे.

श्री.दत्तात्रय संभाजी ढगे (सर).
श्री क्षेत्र अरण


वाचा :संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग

संत  सावतामाळी अँप डाउनलोड रा.