विश्रांतीचा ठाव – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग – 28

विश्रांतीचा ठाव – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग – 28

विश्रांतीचा ठाव । पंढरीराव विटेवरी ।
धावोनिया जाईन गावा । अवघा हेवा चुकवील ॥
दरुशने होय लाभ । नभानभ दाटणी ॥
सावता म्हणे जन्म व्याधी । तुटे उपाधी कर्माची

 

मथितार्थः या अभंगातून सावता महाराजांनी विठ्ठलाच्या भेटीचे महत्त्व सांगितले आहे. भक्त पुंडलिकाने आपल्या भक्तिच्या जोरावर विठ्ठलाला विटेवर उभा केले आहे आणि सर्व भाविक भक्तांना विठ्ठल हा आपले विश्रांतीचे ठिकाण आहे, असे वाटू लागले. या विठ्ठलाच्या दर्शनाने जन्म मृत्युच्या फेऱ्यातून सुटका होते, म्हणून त्यांना विठ्ठलाचे दर्शन परत परत घ्यावे वाटते. पृथ्वीतलावरील असणारे अज्ञानी जीव यांचा उद्धार करण्यासाठी पुंडलिकच्या माध्यमातून विठ्ठलाने अवतार घेऊन, आपले कार्य चालू ठेवले आहे. संसारिक गर्तेत बुडवणाऱ्या सर्व अज्ञानी दुःखितासाठी विठ्ठलाचे चरण हेच विश्रांतीचे ठिकाण आहे. मानवाला आणखी जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका करण्यासाठी हेच स्थान योग्य वाटते. “चला पंढरीला जाऊ, रुखुमादेवी वरा पाहू डोळे निवतील कान, मना तेथे समाधान”, या वचनाप्रमाणे भाविकांची अवस्था होते ,असे सावता महाराज या अभंगातून सांगतात.

श्री.दत्तात्रय संभाजी ढगे (सर).
श्री क्षेत्र अरण


वाचा :संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग

संत  सावतामाळी अँप डाउनलोड रा.