वेद श्रुति शास्त्रे पुराण श्रमली – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग – 22

वेद श्रुति शास्त्रे पुराण श्रमली – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग – 22

वेद श्रुति शास्त्रे पुराण श्रमली । परी तया विठ्ठली गम्य नाही ॥
तें या पुंडलिका सुलभ पै जाहले । उद्धारावया आले भीमातटी ॥
सावता म्हणे धन्य विठ्ठल दयाळ । लागों नेंदी मळ भाविकांसी ।

 

मथितार्थ : या अभंगात महाराज भक्त पुंडलिकाचे उदाहरण देवून सांगतात की, परमेश्वर प्राप्तीचा अनुभव यायचा असेल तर कोणत्याही वादाच्या, ग्रंथाच्या अभ्यासाची गरज नाही, तर परमेश्वराच्या नामस्मरणाची गरज आहे. ज्ञानापेक्षा भक्ति महत्वाची आहे. हा संदेश सावता महाराजांनी दिला आहे. विठ्ठालाच्या रुपाचे वर्णन करून सर्व शास्र, वेद, पुराण थकली पण परमेश्वर कसा आहे, हे समजले नाही. पण हेच काम भक्त पुंडलिकाने आपल्या आई वडिलांची सेवा करून साक्षात परमेश्वरालाही विटेवर थांबायला लावले. पुंडलिकाने आपले कर्तव्य, आपले काम हीच ईश्वर सेवा आहे, हे जाणून स्वताचा उद्धार करून घेतला. त्याच प्रमाणे सावता महाराजांनी आपल्या भक्तीच्या जोरावर विठ्ठलाला मळ्यात बोलावले व आपलाही उद्धार करून घेतला, या दोघांच्याही उदाहरणावरुन असे लक्षात येते की, भक्तीचा मार्ग हा सोपा आहे. ग्रंथाच्या वेदाच्या ज्ञानापेक्षा भक्ति सोपी सुलभ हेच खरे. मानवी शरीर धारण केलेल्या जीवाबरोबर कर्म येतेच, हेच कर्म, त्यालाच परमेश्वर मानून भक्ति करावी. असे सावता महाराज सांगतात.

श्री.दत्तात्रय संभाजी ढगे (सर).
श्री क्षेत्र अरण


वाचा :संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग

संत  सावतामाळी अँप डाउनलोड रा.