उचित जे तुम्हा गोडी । आवडे जगजेठी करतो ।
वास देई चरणापाशी । हेचि तुम्हांसि मागतो ।।
कन्या -पुत्र यांचा भाग । तोडा तोडा लिगाड ।।
माळी सावता लागे चरणी । करी विनवणी विठ्ठल ।।
मथितार्थ: वरील अभंगात सावता महाराजांनी विठ्ठलाला विनंती केली, हे विठ्ठला मला मुलाबाळाच्या मोहपाशात गुंतू देऊ नकोस, कारण त्यामुळे माझ्या भक्तिमध्ये खंड पडेल. मला संसार करायचा आहे पण त्यातील मायापाशात मनाने अडकून ठेवू नकोस अशी विनंती ते विठ्ठलाला करतात. सावता महाराजाना वाटते जगाचा नियंता असणारा परमेश्वर आपल्या भक्ताकडून योग्य अशा गोष्टी करवून घेतो. आपल्या भक्ताला काय आवडते, त्याला कशात रुची आहे, अशा गोष्टी तो त्यांच्याकडून करवूनच घेतो. कारण परमेश्वर हाच सर्वश्रेष्ठ आहे, म्हणून सावता महाराज परमेश्वराच्या चरणाजवळ जागा मागतात, परंतु हे करत असताना सावता महाराजांना आपल्या
कुटुंबातील बायका मुलामध्ये गुंतून राहू नये, प्रपंच तर महाराजांना करायच आहेच पण त्याची आसक्ती त्यांना नको आहे, मुलेबाळे त्यांना हवी आहेत पण त्याच्यात गुरफुटून राहू नये, असे महाराजांचे म्हणणे आहे, प्रपंचात असूनसुद्धा विठ्ठलाची ओढ त्यांना आहे.
श्री.दत्तात्रय संभाजी ढगे (सर).
श्री क्षेत्र अरण
वाचा :संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत सावतामाळी अँप डाउनलोड करा.