भंगो नेदी माझे प्रेम । चालवावा हाचि नेम ॥
ऐका दया धना देवा । कोण भाग्य तुझी सेवा ॥
तुझे सेवे वाचुनी काही । पाहता सुख कोठे नाही ॥
अगा रुक्मिणी-रमणा । सावता विनवितो चरणा ।
मथितार्थः या अभंगात सावता महाराज परमेश्वराच्या सेवेत परमसुख आहे असा स्वानुभव सांगतात, ते म्हणतात हे विठ्ठला, माझे मन सतत तुझ्या भक्तीमध्ये राहू दे, माझ्या भक्तीमध्ये खंड पडू देऊ नको, यातच मला खरे सुख मिळते. विठ्ठलाच्या नामाचा मोठेपणा सांगताना महाराज म्हणतात, हे विठ्ठला मी तुझी भक्ती करतो, त्या भक्तीत कधीच खंड पडू देऊ नका. कारण ही भक्ती अविरत राहू द्या भक्तीचा हा माझा नियम व्रत चालू राहू द्या तुमची सेवा करण्यातच माझ्या जीवनाचे कल्याण आहे, यातच मी धन्यता मानतो. सेवा करण्यासारखे दुसरे सुख माझ्या जीवनात नाही. असा विनम्र भाव त्यांच्या ठिकाणी दिसून येतो. अशा पद्धतीने सावता महाराज भक्तीचा महिमा या अभंगातून आपल्याला सांगतात.
श्री.दत्तात्रय संभाजी ढगे (सर).
श्री क्षेत्र अरण
वाचा :संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत सावतामाळी अँप डाउनलोड करा.