एक नाम हरी द्वैत्य नाम दुरी। तोचि कल्पवरी, चिरंजीव।।
ऐशा ज्याचा भाव, वाचे नारायण। नाही त्या बंधन, कळीकाळाचे ।।
न लगे सायास, न पडे संकट। नामे सोपी वाट, वैकुंठाची।
सावता म्हणे नर, तो प्रत्यक्ष पावन। गाई रामकृष्ण, सर्व काळ।।
मथितार्थ : या अभंगात सावता महाराज नामाचा मोठेपणा सांगतात. माणसाने देवाचे नामस्मरण करावे, नामाच्या जोरावर तो मोक्षाचा मार्ग सहज पार करू शकतो. महाराज सांगतात, देवाचे नाव घेण्यासाठी कोणतेही कष्ट पडत नाहीत. म्हणून ते नामस्मरण करायला सांगतात. परमेश्वराचे फक्त नाव घेतले म्हणजे नाम स्मरण केले. तर आपण अनेक युगानुयुगे चिरंजीव होऊ असा नामाचा मोठेपणा महाराज सांगतात.
जादूटोणा, मंत्र तंत्र, तीर्थाटन न करता फक्त मुखाने परमेश्वराचे नामस्मरण करावे आणि यासाठी कशाचेही बंधन नाही. किंवा त्यामुळे कसलेही संकट येत नाही. उलट वैकुंठाचा मार्ग लवकर सापडतो, एवढा विश्वास महाराजांचा नामस्मरणावर आहे. जो माणूस मुखाने उच्चार करील तो पवित्र असतो. भक्ती मार्गातील वैकुंठाची वाट चालायची असेल तर परमेश्वराचे नामस्मरण हा साधा सोपा मार्ग महाराजांनी सांगितला आहे. श्रमसंस्कृती जशी सांगतात तशीच नाम संस्कृती सावता महाराज या अभंगातून सांगतात
श्री.दत्तात्रय संभाजी ढगे (सर).
श्री क्षेत्र अरण
वाचा :संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग
संत सावतामाळी अँप डाउनलोड करा.