कृपाळू तू हरी – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग – 11

कृपाळू तू हरी – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग – 11

कृपाळू तू हरी। दीन दासाते उद्धारी।।
नको काही दुजा हेत। सदा जडो नामी चित्त।।
दुजे आणिक नको काही। ठाव द्यावा संतापायी।।
माळी सावता विनंती करी। परिसा परिसा तुम्ही हरी।।

 

मथितार्थ : या अभंगात सावता महाराज संसाररूपी भवसागरातून तरुन जाण्यासाठी हरीचे नाव हेच एकमेव तारणारे आहे. तोच निर्वाणीची सोय करणारा सोयरा आहे, अशावेळी मनात दुसरेपणाचा भाव येता कामा नये. वेळोवेळी नामाचा गजर करावा, म्हणजे मन नामात गुंतून राहील आणि संत सज्जनाच्या पायापाशी जागा मिळावी, ही मागणी महाराज करतात, नव्हे तर प्रत्यक्ष पांडुरंगाला परत परत विनंती करतात. परमेश्वर नेहमी दीन-दुबळ्यांच्या संकट समयी धावून जातो व आपले कृपाळू हे नाव सार्थ करतो. यासाठीच सावता महाराजही विठ्ठलाला विनंती करतात, यावरून त्याची आर्त भावना परमेश्वर भेटीची लक्षात येते. परमेश्वराच्या कृपादृष्टीसाठी ते तळमळत आहेत. संताचा सज्जनाचा आपल्याला सहवास लाभावा कारण देव हा त्यांच्यात आहे, असे त्यांना वाटते. अशा प्रकारचा विठ्ठलाच्या भक्तीचा मोठेपणा सावता महाराज या अभंगातून आपल्याला सांगतात.

श्री.दत्तात्रय संभाजी ढगे (सर).
श्री क्षेत्र अरण


वाचा :संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग

 

 

संत  सावतामाळी अँप डाउनलोड रा.