प्रपंची असुनी परमार्थ साधावा – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग – 10
प्रपंची असुनी परमार्थ साधावा । वाचे आठवावा पांडुरंग ।।
उंच नीच काही न पाहे सर्वथा । पुराणीच्या कथा पुराणीच ॥
घटका आणि पळ साधी उतावीळ । वाउगा तो काळ जाऊ नेदी ।।
सावता म्हणे कांते जपे नामावळी । हृदयकमळी पांडुरंग ।।
मथितार्थ : या अभंगात सावता महाराज आपल्याला बायकोच्या माध्यमातून सर्वच संसारिक लोकांना उपदेश करतात देवाच्या भेटीसाठी शरीराला यातना देण्याची गरज नाही. तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचे झाले तर “ठायीच बैसुनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा” संसार करत करत सांगतात, परमार्थ करावा असे महाराज सांगतात. सावता महाराज या अभंगामध्ये प्रपंच व परमार्थ यांचा आपल्या जीवनामध्ये झालेल्या संगमाच्या माध्यमातून संसारिक किंवा सामान्य प्रापंचिकांना सोपा पण मोलाचा संदेश देतात. संसारात राहून ईश्वराची उपासना भक्ती करता येते संसारातील कामे करत असतानाच देवाचे नाव घ्यावे, त्याचे स्मरण करावे कारण देव लहान मोठा गरीब श्रीमंत असा भेदभाव करत नाही सर्वांचा देव उद्धार करतो.
श्री.दत्तात्रय संभाजी ढगे (सर).
श्री क्षेत्र अरण
वाचा :संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत सावतामाळी अँप डाउनलोड करा.