कांदा, मुळा, भाजी।अवघी विठाबाई माझी ।॥
लसूण, मिरची, कोथिंबीरी । अवघा झाला माझा हरी ।।
ऊस गाजर रताळू, अवघा झालासे गोपाळू।।
मोट, नाडा, विहीर, दोरी |अवधी व्यापली पंढरी ।।
सावता म्हणे केला मळा । विठ्ठल पायी गोविला गळा ।।
मथितार्थ : या अभंगात सावता महाराज विठ्ठल भक्तीची गोडवी गातात. आपल्या व्यवसायालाच परमेश्वर मानतात. कर्मातच देव शोधा, देवासाठी संसार सोडून संन्यास घ्यावा लागत नाही. अशाप्रकारचा उपदेश त्यांनी अभंगातून व्यक्त केला आहे. आपल्या मळ्यातील पिकातच त्यांना परमेश्वर म्हणजे प्रत्यक्ष विठ्ठलच दिसतो .मळ्यातील पिकांचे आयुर्वेदीक महत्त्व सावतोबांना माहित असावे.
श्री.दत्तात्रय संभाजी ढगे (सर).
श्री क्षेत्र अरण
वाचा :संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत सावतामाळी अँप डाउनलोड करा.