पैल पहाहो परब्रह्म भुललें – संत सावतामाळी अभंग

पैल पहाहो परब्रह्म भुललें – संत सावतामाळी अभंग


पैल पहाहो परब्रह्म भुललें ।
जगदीश कांहो परतंत्र झालें ॥ १ ॥
काया सुख केलें येणें नेणिजे कोण।
भाग्य गौळीयाचें वर्णिजे ॥ २ ॥
आदि अंतू नाहीं जया व्यापका ।
माया उखळी बांधिला देखा ॥ ३ ॥
सर्व सुखाचें सुख निर्मळ ।
कैसें दिसताहे श्रीमुखकमळ ॥ ४ ॥
योगियां ह्रदयमकळींचें हें निधान ।
दृष्टी लागे झणी उतरा निंबलोण ॥ ५ ॥
सावत्या स्वामी परब्रह्म पुतळा ।
तनुमनाची कुरवंडी ओंवाळा ॥ ६ ॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.


संत सावतामाळी अँप डाउनलोड करा.

पैल पहाहो परब्रह्म भुललें – संत सावतामाळी अभंग समाप्त.

View Comments

  • या अभंगाचा अर्थ ह्या अभंगात भगवान विठ्ठलाच्या पैलींवर पुर्णपणे भरोसा करण्याची अपेक्षा केली जाते. वारकरी संप्रदायानुसार, जीवनात भगवान सार्वत्रिक आणि सर्वशक्तिशाली आहे, आणि त्याच्या अवलंबनावर एकमेव विश्वास ठेवणे आवश्यक आहे. अभंगाच्या विविध कौशल्याने, अर्जुन जन्माला येणारा आनंद आणि उत्साह प्रकट करते, आणि त्याच्या अंतरातील भावना आणि आत्मविश्वासाची महत्त्वाकांक्षा करते.