कांदा मुळा भाजी – संत सावतामाळी अभंग

कांदा मुळा भाजी – संत सावतामाळी अभंग


कांदा मुळा भाजी । .
अवघी विठाबाई माझी ॥ १ ॥
लसूण मिरची कोथिंबिरी ।
अवघा झाला माझा हरी ॥ २ ॥
मोट नाडा विहीर दोरी ।
अवघी व्यापिली पंढरी ॥ ३ ॥
सावता म्हणे केला मळा ।
विठ्ठल पायीं गोंविला गळा ॥ ४ ॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.


संत सावतामाळी अँप डाउनलोड करा.

कांदा मुळा भाजी – संत सावतामाळी अभंग समाप्त.

View Comments

  • कांदा मुळा भाजी । .
    अवघी विठाबाई माझी ॥ १ ॥
    लसूण मिरची कोथिंबिरी ।
    अवघा झाला माझा हरी ॥ २ ॥

    वास्को द गामा हा भारतात समुद्रमार्गे येणारा पहिला दर्यावर्दी. तो पोर्तुगीज होता. २० मे १४९८ रोजी त्याने कोझिकोडे येथे भारताच्या भूमीवर पाय ठेवला. त्यानंतर पोर्तुगीजांनी हळूहळू आपले बस्तान भारतात बसविले.
    पोर्तुगीजांनी बटाटा, भेंडी, टोमॅटो, पपई, काजू, मका, अशा अनेक वनस्पती भारतात आणल्या. मिरची ही त्यातील एक.
    संत सावता माळी यांचा जन्म अरण या गावी शके 1172 म्हणजेच इ.स. 1250 साली झाला. त्यांच्या काळात मिरची हा पदार्थ भारतात नव्हताच. पोर्तुगीज येण्यापूर्वी भारतीय स्वयंपाकात तिखटपणासाठी म्हणून सुंठ, मिरी व पिंपळी यांचा वापर केला जाई. त्यामुळे संत सावता माळी यांच्या वरील अभंगात “मिरची” ऐवजी “मरिच” (मिरीचं संस्कृत नाव ) हा शब्द असावा.