भली केली हीन याति – संत सावतामाळी अभंग

भली केली हीन याति – संत सावतामाळी अभंग


भली केली हीन याति ।
नाही वाढली महंती ॥ १ ॥
जरी असतां ब्राह्मण जन्म ।
तरी हें अंगीं लागतें कर्म ॥ २ ॥
स्नान नाहीं संध्या नाहीं ।
याति कुळ संबंध नाहीं ॥ ३ ॥
सावता म्हणे हीन याती ।
कृपा करावी श्रीपती ॥ ४ ॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.


संत सावतामाळी अँप डाउनलोड करा.

भली केली हीन याति – संत सावतामाळी अभंग समाप्त.