ऐकावे विठ्ठल धुरे – संत सावतामाळी अभंग
ऐकावे विठ्ठल धुरे ।
विनंती माझी हो सत्वरें ॥ १ ॥
करी संसाराची बोहरी ।
इतुकें मागतों श्रीहरी ॥ २ ॥
कष्ट करितां जन्म गेला ।
तुझा विसर पडला ॥ ३ ॥
माळी सावता मागे संतान ।
देवा करी गा निःसंतान ॥ ४ ॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
संत सावतामाळी अँप डाउनलोड करा.