दोघे सारिखे सारिखे विश्वनाथ – संत संताजीचे अभंग – ८०
दोघे सारिखे सारिखे विश्वनाथ विठल सखे । एक उभा राऊळा आंगणीँ ।। एक घाना बैसे जाऊनि । एक जपे जप माळ,एक वाजवितो टाळ ।। एका आंगा लाविले गंध । एका अंगा येई सुगंध ।। एक वाजवितो विणा । एक दाखवितो खुणा ।। एक म्हणतो अभंग । एक म्हणे पांडुरंग ।। संतु म्हणे एक जीँव । दोहोँ कुडी दिला ठाव ।।
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
दोघे सारिखे सारिखे विश्वनाथ – संत संताजीचे अभंग – ८०