देवासीँ अवतार भक्तांसीँ – संत संताजीचे अभंग – ७९
देवासीँ अवतार भक्तांसीँ – संत संताजीचे अभंग – ७९
देवासीँ अवतार भक्तांसीँ संसार।
दोहीँचा विचार एकपणेँ ।।
भक्ताशी सोहळे देवाचिये आंगे।
देव त्यांच्या संगे सुख भोगी ।।
देवेँ भक्तारूप दिलासे आकार।
भक्ती त्याचा परिवार वाणिला ।।
एक आंगीँ दोन्हीँ झालीँ हीँ निर्माण ।
देव भक्तपण स्वामी सेवा ।।
संतु म्हणे येथेँ नाहीँ भिन्न भाव ।
भक्त तोचि देव देव भक्त ।।
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
देवासीँ अवतार भक्तांसीँ – संत संताजीचे अभंग – ७९
View Comments
देवाचे आगमन हा अवतार मानला जातो तुम्ही आम्ही जन्माला येतो प्रारब्धानुसार म्हणून आपण जन्म मृत्यू फे-यात अडकणारे सामान्य जीव पण संत मात्र देवाच्या इच्छेने जन्माला येतात म्हणून ते आपल्यापेक्षा निराळे देवाची अनन्य भक्ती करुन ते भक्तपण पावतात देवाचे सोहळे करण्यातच भक्ताला आनंद असतो त्यामुळे भगवंत त्यांच्या सोबत हा आनंद उपभोगतो भक्ताच्या जीवनाला भगवंत आकार देतो भक्तीतूनच देव साकार होतो तसं पाहिलं तर एका अंगी निर्माण झालेली ही दोन रुपे आहेत देव कधी भक्तपण अनुभवतो व स्वामीसेवा करून भक्त सूखावतो जिथे कोणताच भेदभाव शिल्लक रहात नाहीअस अतूट नातं म्हणजे देव भक्ताच भक्त रक्षणा करीता कधी देव भक्तांचे रुप घेऊन त्याला तारतो तर भक्तीच्या अत्युच्च पदावर पोहोचल्यावर भक्ताला देवपण प्राप्त होते