Skip to content
जन्मोनियां इहलोकीँ काय – संत संताजीचे अभंग – ६३
जन्मोनियां इहलोकीँ काय केलेँ ।
पुष्कळच ते धन मिळविलेँ ।।
आणिक मिळविलेँ वतनवाडिशीँ ।
रांडा आणि पोरां आवघ्याशीँ ।।
संतु म्हणी तुम्हीँ मागेँ ते सरावेँ ।
मरावेँ परी किर्तीरूपे उरावेँ।।
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
जन्मोनियां इहलोकीँ काय – संत संताजीचे अभंग – ६३